ढोकी – धाराशिव तालुक्यातील भिकार सारोळा येथे अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री घराचे कुलूप-कोंडा तोडून सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी ढोकी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
भिकार सारोळा (ता. जि. धाराशिव) येथील रहिवासी रोहन सुरेश पाडुळे (वय २५ वर्षे) यांच्या घराचे कुलूप व कोंडा दिनांक २४ ऑगस्ट २०२६ रोजी मध्यरात्री १२.०१ ते १.३० वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने तोडला. घरात बेकायदेशीररीत्या प्रवेश करून चोरट्याने घरातील ८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण २० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
ढोकी पोलिसांत गुन्हा नोंद
याप्रकरणी रोहन पाडुळे यांनी २७ ऑगस्ट २०२६ रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून ढोकी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३३१(४) आणि ३०५(ए) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ढोकी पोलीस करत आहेत.





