• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, November 3, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

एसटी बसमध्ये बनावट दिव्यांग कार्ड वापरून फसवणूक; आगार प्रमुखासह प्रवाशाविरुद्ध तुळजापूर पोलिसांत गुन्हा दाखल

• महिला वाहक व चालकाला धमकावणे आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप

admin by admin
September 18, 2026
in ताज्या बातम्या
Reading Time: 2 mins read
एसटी बसमध्ये बनावट दिव्यांग कार्ड वापरून फसवणूक; आगार प्रमुखासह प्रवाशाविरुद्ध तुळजापूर पोलिसांत गुन्हा दाखल
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर / धाराशिव:  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमध्ये बनावट दिव्यांग ओळखपत्र (कार्ड) वापरून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी, तसेच महिला वाहक व चालकास दमदाटी करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तुळजापूर आगार प्रमुखासह एका प्रवाशाविरुद्ध तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छगन बापुराव लोखंडे आणि तुळजापूरचे आगार प्रमुख (DM) राम शिंदे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, २६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी धाराशिव ते सोलापूर (बस क्र. MH 20 BL 2583) या मार्गावर एसटी चालक उमेश दिलीप पवार आणि महिला वाहक सौ. आर. एस. पवार हे कर्तव्यावर होते. कावलधारा गावाजवळ प्रवासी छगन बापुराव लोखंडे यांनी बसमध्ये प्रवास करताना ५३ टक्के शारीरिक दुर्बलतेचे १/४ सवलतीचे दिव्यांग कार्ड दाखवून सवलतीच्या तिकिटाची मागणी केली.

महिला वाहकाने महाव्यवस्थापकांच्या परिपत्रकानुसार मोबाईल ॲपवर सदर कार्डची तपासणी केली असता ते कार्ड संशयास्पद व बनावट असल्याचे लक्षात आले आणि प्रणालीवर त्याची कोणतीही नोंद आढळली नाही. वाहकाने मूळ तिकिटाची मागणी केली असता, लोखंडे यांनी महिला वाहकाशी हुज्जत घालत अरेरावीची भाषा वापरली व वाद घातला.

आगार प्रमुखांचा दबाव आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

या प्रवासादरम्यान तुळजापूरचे आगार प्रमुख राम शिंदे हे देखील त्याच बसमध्ये प्रवास करत होते. प्रवासी लोखंडे हे आपल्या परिचयाचे असल्याने आगार प्रमुख शिंदे यांनी शासकीय नियमांचे उल्लंघन करून कर्मचाऱ्यांवर दबाव आणला. “याला सवलतीचे तिकीट द्या, नाहीतर निलंबन करू,” अशी धमकी देत त्यांनी महिला वाहकावर दबाव आणून सवलतीचे तिकीट देण्यास भाग पाडले, असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

बस तुळजापूर स्थानकात पोहोचल्यानंतर प्रवासी लोखंडे यांनी बस आडवून चालक व वाहकास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यावेळी आगार प्रमुख राम शिंदे यांनी शासकीय कारवाई करण्याऐवजी उलट “लोखंडे माझ्या जवळचा आहे, त्याचे कार्ड जमा करू नका, फाडून टाका” असा बेकायदेशीर आदेश देऊन शासकीय पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला, असे तक्रारीत म्हटले आहे.

माहिती अधिकारात कार्ड बनावट असल्याचे उघड

यानंतर संबंधित विभागाशी व जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाशी पत्रव्यवहार केला असता, छगन लोखंडे यांच्या नावावर असे कोणतेही ५३ टक्के दुर्बलतेचे कार्ड जारी करण्यात आले नसल्याचे स्पष्ट झाले. यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार चालक उमेश पवार यांनी तुळजापूर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली.

विविध कलमान्वये गुन्हा नोंद

चालक उमेश दिलीप पवार यांच्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात आरोपी छगन बापुराव लोखंडे आणि आगार प्रमुख राम शिंदे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम १३२, २२१, २३८ (पुरावा नष्ट करणे), ३१८(४) (फसवणूक), ३३६(३), ३४०(२), १२६, ३५१(२), ३५१(३) (धमकावणे), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा (गु.र.नं. ०४६१/२०२६) दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास तुळजापूर पोलीस करत आहेत.

पोलिसांची ८ महिने टोलवाटोलव, आगार प्रमुखाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न; एसटी चालकाच्या आत्मदहनाच्या इशाऱ्यानंतर अखेर FIR

तपशील / घटक माहिती
गुन्हा घडलेली तारीख
२६/०१/२०२६ (वेळ: सकाळी ०६:३५ ते ०७:१५ वाजेदरम्यान)
गुन्हा दाखल झालेली तारीख
१७/०९/२०२६ (वेळ: रात्री २२:०४ वाजता)
तक्रार / निवेदनाचे प्रमुख मुद्दे
• बनावट दिव्यांग कार्डधारक छगन बापुराव लोखंडे याच्यासह त्याला पाठीशी घालणारे आगार प्रमुख (DM) राम शिंदे यांच्यावर बीएनएस कलम २३८ (पुरावा नष्ट करणे), ३(५) व इतर संबंधित कलमान्वये थेट सह-आरोपी म्हणून एफआयआर (FIR) दाखल करण्यात यावा.

 

• तक्रारदार शासकीय कर्मचाऱ्याला तक्रार नोंदवताना रात्री उशिरापर्यंत (पहाटे ०२:५० वाजेपर्यंत) पोलीस ठाण्यात बसवून ठेवून मानसिक छळ करणाऱ्या तुळजापूर पोलीस ठाण्याच्या जबाबदार कर्मचाऱ्यांवर चौकशी करून कारवाई करण्यात यावी.

 

• आगार प्रमुखांनी “कार्ड फाडून टाका” असा बेकायदेशीर आदेश देऊन शासकीय पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आणि कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांना दिलेल्या निलंबनाच्या धमकीप्रकरणी कारवाई व्हावी.
Previous Post

‘मराठवाड्याची शिवकाशी’ तेरखेड्यातील फटाका उद्योग संशयाच्या भोवऱ्यात!

Next Post

पोलिसांची ८ महिने टोलवाटोलव, आगार प्रमुखाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न; एसटी चालकाच्या आत्मदहनाच्या इशाऱ्यानंतर अखेर FIR

Next Post
पोलिसांची ८ महिने टोलवाटोलव, आगार प्रमुखाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न; एसटी चालकाच्या आत्मदहनाच्या इशाऱ्यानंतर अखेर FIR

पोलिसांची ८ महिने टोलवाटोलव, आगार प्रमुखाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न; एसटी चालकाच्या आत्मदहनाच्या इशाऱ्यानंतर अखेर FIR

ताज्या बातम्या

कळंब – मोबाईलवर गेम खेळू न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून १६ वर्षांच्या मुलीची आत्महत्या

धाराशिवमध्ये तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी १२ जणांविरुद्ध गुन्हा

November 3, 2026
चारित्र्याच्या संशयातून महिलेचा खून; फरार आरोपी कळंब पोलिसांच्या ताब्यात

चारित्र्याच्या संशयातून महिलेचा खून; फरार आरोपी कळंब पोलिसांच्या ताब्यात

November 3, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तुळजापूरमध्ये १३ वर्षीय मुलाचे अपहरण; अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

November 3, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या चार घटना; दोन म्हशींसह सोन्याचे मंगळसूत्र व मोबाईल लंपास

November 3, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

कौटुंबिक वादातून पत्नी व सासऱ्यावर चाकूने हल्ला; परंड्यात पतीविरुद्ध गुन्हा

November 2, 2026

Recent Posts

  • धाराशिवमध्ये तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी १२ जणांविरुद्ध गुन्हा
  • चारित्र्याच्या संशयातून महिलेचा खून; फरार आरोपी कळंब पोलिसांच्या ताब्यात
  • तुळजापूरमध्ये १३ वर्षीय मुलाचे अपहरण; अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल
  • धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या चार घटना; दोन म्हशींसह सोन्याचे मंगळसूत्र व मोबाईल लंपास
  • कौटुंबिक वादातून पत्नी व सासऱ्यावर चाकूने हल्ला; परंड्यात पतीविरुद्ध गुन्हा
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!