• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, October 14, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

संत गोरोबा काका मंदिर विकास आराखड्यातील अनियमिततेविरोधात ५ नोव्हेंबरपासून आमरण उपोषणाचा इशारा

ग्रामस्थ व भाविकांचे प्रशासकाला निवेदन

admin by admin
October 14, 2026
in विशेष बातम्या
Reading Time: 1 min read
संत गोरोबा काका मंदिर विकास आराखड्यातील अनियमिततेविरोधात ५ नोव्हेंबरपासून आमरण उपोषणाचा इशारा
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

तेर (धाराशिव): श्री संत गोरोबा काका व शिव मंदिर परिसर विकास आराखड्याची आणि सुरू असलेल्या कामांची संपूर्ण माहिती न दिल्यास येत्या ५ नोव्हेंबर २०२६ पासून मंदिरासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थ आणि भाविक भक्तांच्या वतीने देण्यात आला आहे. यासंदर्भात श्री. महादेव भागवत खटावकर व इतर ग्रामस्थांनी मंदिराच्या मा. प्रशासकांना सविस्तर निवेदन सादर केले आहे.

मूळ आराखडा बदलल्याचा आरोप

निवेदनात नमूद केल्यानुसार, संत गोरोबा काका मंदिर परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून विकासकामे सुरू आहेत. मात्र, गावकऱ्यांसमोर उद्घाटनावेळी व्हिडिओद्वारे जो मूळ आराखडा दाखवण्यात आला होता, प्रत्यक्षात मात्र त्यापेक्षा पूर्णतः वेगळी कामे केली जात असल्याचा आक्षेप ग्रामस्थांनी घेतला आहे. सध्या सुरू असलेल्या कामांचे अंदाजपत्रक (इस्टिमेट), कामांची मुदत, झालेली व अपूर्ण कामे तसेच या कामांना प्रशासकीय मान्यता आहे का, याची सविस्तर माहिती देण्याची मागणी करण्यात आली आहे.

जागा अतिक्रमण व महाद्वाराच्या कामावर आक्षेप

मंदिराच्या पूर्व बाजूला हद्द निश्चित करून संरक्षक भिंत (कंपाऊंड वॉल) बांधण्यात आली आहे; परंतु उत्तर बाजूला मंजूर असूनही संरक्षक भिंत का बांधण्यात आली नाही, असा सवाल निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे. त्या बाजूला मंदिराची सुमारे ४१ फूट जागा ताब्यात येणे बाकी असताना ती अद्याप का घेतली नाही, तसेच मंदिराच्या जागेत गेट उभारून करण्यात आलेला रस्ता कधी बंद करणार, अशी विचारणाही प्रशासनाकडे करण्यात आली आहे. याशिवाय मंदिराचे मोजणी शीट भाविकांसाठी नोटीस बोर्डावर लावण्याची मागणी करण्यात आली आहे.

महाद्वार, शौचालय व सभामंडपाच्या रचनेवर नाराजी

सध्या चालू असलेले महाद्वाराचे काम चुकीच्या ठिकाणी होत असून ते तत्काळ थांबवावे आणि मूळ आराखड्यानुसार जुन्या महाद्वाराच्या ठिकाणीच नगारखान्यासह नविन महाद्वार उभारावे, अशी मागणी निवेदनात आहे. शौचालयाचे स्थान बदलण्यावर तसेच मंदिर परिसरातील कामे वास्तुशास्त्रानुसार करण्यावरही भर देण्यात आला आहे. मंदिरासमोरील नव्याने उभारण्यात आलेल्या मंडपात गरजेपेक्षा जास्त कॉलम (खांब) उभे केल्याने कीर्तनकार, वादक, टाळकरी आणि भाविकांना मोठी अडचण निर्माण होत असून या रचनेबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

प्रशासनाला ५ नोव्हेंबरचा अल्टिमेटम

या सर्व बाबींची सविस्तर माहिती वेळेत उपलब्ध न झाल्यास ५ नोव्हेंबर २०२६ रोजी मंदिरासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर महादेव भागवत खटावकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व भाविकांच्या स्वाक्षऱ्या असून, त्याच्या प्रती जिल्हाधिकारी धाराशिव, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि ढोकी पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांना माहितीस्तव पाठवण्यात आल्या आहेत.

Previous Post

भूम, परंड्यात घरफोडी; सोन्याचे दागिने, रोकड, कपडे आणि शेळी लंपास

ताज्या बातम्या

संत गोरोबा काका मंदिर विकास आराखड्यातील अनियमिततेविरोधात ५ नोव्हेंबरपासून आमरण उपोषणाचा इशारा

संत गोरोबा काका मंदिर विकास आराखड्यातील अनियमिततेविरोधात ५ नोव्हेंबरपासून आमरण उपोषणाचा इशारा

October 14, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

भूम, परंड्यात घरफोडी; सोन्याचे दागिने, रोकड, कपडे आणि शेळी लंपास

October 14, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

सव्वापाच लाखांचा ट्रॅक्टर घेतला अन् अवघे १५०० रुपये फोन पे करून दिला ६ लाखांचा बाऊन्स चेक

October 14, 2026
तुळजाभवानी मंदिरात व्हीआयपी वशिलेबाजी अन् बनावट पासेसचे रॅकेट?

तुळजाभवानी मंदिरात व्हीआयपी वशिलेबाजी अन् बनावट पासेसचे रॅकेट?

October 14, 2026
ब्रेकिंग न्यूज : तुळजापूर हादरले! नगरपरिषद वाहनतळासमोर मध्यरात्री दोन गटांत तुंबळ राडा अन् गोळीबार

ब्रेकिंग न्यूज : तुळजापूर हादरले! नगरपरिषद वाहनतळासमोर मध्यरात्री दोन गटांत तुंबळ राडा अन् गोळीबार

October 14, 2026

Recent Posts

  • संत गोरोबा काका मंदिर विकास आराखड्यातील अनियमिततेविरोधात ५ नोव्हेंबरपासून आमरण उपोषणाचा इशारा
  • भूम, परंड्यात घरफोडी; सोन्याचे दागिने, रोकड, कपडे आणि शेळी लंपास
  • सव्वापाच लाखांचा ट्रॅक्टर घेतला अन् अवघे १५०० रुपये फोन पे करून दिला ६ लाखांचा बाऊन्स चेक
  • तुळजाभवानी मंदिरात व्हीआयपी वशिलेबाजी अन् बनावट पासेसचे रॅकेट?
  • ब्रेकिंग न्यूज : तुळजापूर हादरले! नगरपरिषद वाहनतळासमोर मध्यरात्री दोन गटांत तुंबळ राडा अन् गोळीबार
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!