• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, November 9, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

येरमाळा : पिकअपमधून गोवंशीय जनावरांची निर्दयपणे वाहतूक

 बार्शीच्या चालकावर गुन्हा दाखल, २.७६ लाखांचा मुद्देमाल जप्त

admin by admin
November 9, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

येरमाळा (कळंब) : कोणत्याही प्रकारची चारा-पाण्याची सोय न करता पिकअप वाहनात दाटीवाटीने कोंबून गोवंशीय जनावरांची अवैध व निर्दयपणे वाहतूक करणाऱ्या बार्शी तालुक्यातील एका चालकावर येरमाळा पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी वाहनासह गोवंशीय जनावरे असा एकूण २ लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ८ नोव्हेंबर रोजी दुपारी ४:०४ वाजेच्या सुमारास येरमाळा पोलीस ठाण्याचे पथक गस्तीवर असताना बार्शी ते कळंब रस्त्यावरील जावेद कलेक्शनसमोर संशयास्पद हालचाली दिसल्या. पोलिसांनी एका पिकअप वाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये १ जर्सी गाय, २ खोंड, १ कारवड आणि १ बैल अशी गोवंशीय जनावरे अत्यंत क्रूरपणे व दाटीवाटीने कोंबून भरल्याचे निदर्शनास आले. या जनावरांसाठी कोणतीही चारा-पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली नव्हती.

पोलिसांनी चौकशी केली असता वाहनचालक राजेश दिलीप चौधरी (वय ३५ वर्षे, रा. पिंपळवाडी, ता. बार्शी, जि. सोलापूर) हा विनापरवाना व निर्दयतेने या जनावरांची वाहतूक करत असल्याचे समोर आले. पोलिसांनी पिकअप वाहनासह जनावरे असा एकूण २ लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

याप्रकरणी येरमाळा पोलिसांनी सरकारतर्फे आरोपी राजेश चौधरी याच्याविरुद्ध प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम कलम ११(१)(डी), ११(एफ)(एच)(के), महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम ५, ५(अ)(१)(२), ५(ब) सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ११९ आणि मोटार वाहन कायदा कलम ८३/१७७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास येरमाळा पोलीस करत आहेत.

Previous Post

तुळजापूर : चिवरी येथे पत्र्याच्या शेडमध्ये बोगस डॉक्टरचा पर्दाफाश; पश्चिम बंगालमधील दोघांवर नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

येरमाळा : पिकअपमधून गोवंशीय जनावरांची निर्दयपणे वाहतूक

November 9, 2026
रुग्णांच्या जिवाशी खेळणारा बोगस डॉक्टर उघडकीस; धाराशिवमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल

तुळजापूर : चिवरी येथे पत्र्याच्या शेडमध्ये बोगस डॉक्टरचा पर्दाफाश; पश्चिम बंगालमधील दोघांवर नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल

November 9, 2026
येडशी अग्नितांडव : अग्निशमन दलाच्या निष्काळजीपणाने चार जीव गेले? गावकऱ्यांचा गंभीर आरोप; प्रशासनाच्या हलगर्जीपणाची चौकशी करा!

येडशी अग्नितांडव : अग्निशमन दलाच्या निष्काळजीपणाने चार जीव गेले? गावकऱ्यांचा गंभीर आरोप; प्रशासनाच्या हलगर्जीपणाची चौकशी करा!

November 9, 2026
येडशीत दिवाळीची रात्र ठरली काळरात्र! एकाच कुटुंबातील सहा जणांचा होरपळून मृत्यू ; कृष्णा करंडे मृत्यूच्या दाढेतून बचावला

येडशीत दिवाळीची रात्र ठरली काळरात्र! एकाच कुटुंबातील सहा जणांचा होरपळून मृत्यू ; कृष्णा करंडे मृत्यूच्या दाढेतून बचावला

November 9, 2026
ऐन दिवाळीत काळाचा घाला! येडशीत भीषण आगीत एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू

ऐन दिवाळीत काळाचा घाला! येडशीत भीषण आगीत एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू

November 9, 2026

Recent Posts

  • येरमाळा : पिकअपमधून गोवंशीय जनावरांची निर्दयपणे वाहतूक
  • तुळजापूर : चिवरी येथे पत्र्याच्या शेडमध्ये बोगस डॉक्टरचा पर्दाफाश; पश्चिम बंगालमधील दोघांवर नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल
  • येडशी अग्नितांडव : अग्निशमन दलाच्या निष्काळजीपणाने चार जीव गेले? गावकऱ्यांचा गंभीर आरोप; प्रशासनाच्या हलगर्जीपणाची चौकशी करा!
  • येडशीत दिवाळीची रात्र ठरली काळरात्र! एकाच कुटुंबातील सहा जणांचा होरपळून मृत्यू ; कृष्णा करंडे मृत्यूच्या दाढेतून बचावला
  • ऐन दिवाळीत काळाचा घाला! येडशीत भीषण आगीत एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!