• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, November 19, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

श्री सिद्धिविनायक मल्टिस्टेटचा राष्ट्रीय स्तरावर गौरव‘एक्सलन्स इन बिझनेस ग्रोथ’ पुरस्काराने सन्मानित

धाराशिवच्या सहकार क्षेत्राचा लौकिक उंचावला

admin by admin
November 19, 2026
in धाराशिव शहर
Reading Time: 1 min read
श्री सिद्धिविनायक मल्टिस्टेटचा राष्ट्रीय स्तरावर गौरव‘एक्सलन्स इन बिझनेस ग्रोथ’ पुरस्काराने सन्मानित
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव  : सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी आणि सातत्यपूर्ण व्यवसाय वृद्धीबद्दल धाराशिव येथील श्री सिद्धिविनायक मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड या संस्थेला राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित ‘एक्सलन्स इन बिझनेस ग्रोथ’ (Excellence in Business Growth) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

नवी दिल्ली येथे आज (दि. १९ नोव्हेंबर) पार पडलेल्या ‘इंडियन को-ऑपरेटिव्ह समिट अँड एक्सलन्स अवॉर्ड्स २०२६’ या राष्ट्रीय सोहळ्यात संस्थेला हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. संस्थेच्या वतीने मुख्याधिकारी राजेश जाधव आणि सहमुख्याधिकारी अरविंद गोरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासकीय अध्यक्ष विद्याधर अनासकर यांच्यासह केंद्रीय सहकार विभागातील वरिष्ठ मान्यवर उपस्थित होते.

विश्वास आणि पारदर्शकतेची पावती सभासदांचा विश्वास, पारदर्शक व्यवहार, आर्थिक शिस्त, तत्पर ग्राहक सेवा आणि प्रभावी व्यवस्थापन यांच्या जोरावर संस्थेने अल्पावधीतच भरीव प्रगती साधली आहे. संस्थेच्या या व्यवसाय वृद्धीची आणि सहकार क्षेत्रातील योगदानाची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेल्याने जिल्ह्याच्या सहकार चळवळीत अभिमानाचे वातावरण आहे.

“हा पुरस्कार संस्थेवर सर्वांनी दाखविलेल्या विश्वासाचा आणि एकत्रित प्रयत्नांचा सन्मान आहे. या यशामुळे भविष्यातही सहकाराच्या माध्यमातून अधिक विश्वासार्ह सेवा आणि समाजाभिमुख कार्य करण्याची नवी ऊर्जा मिळाली आहे.” — दत्ताभाऊ कुलकर्णी, संस्थापक, श्री सिद्धिविनायक मल्टिस्टेट

या राष्ट्रीय सन्मानाबद्दल संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी आनंद व्यक्त करत संस्थेशी जोडलेले सर्व सभासद, ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक, संचालक मंडळ, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. या यशामुळे धाराशिवच्या सहकार क्षेत्राचा नावलौकिक देशपातळीवर उंचावला असून, संस्थेच्या वाटचालीत हा एक ऐतिहासिक टप्पा ठरला आहे.

Previous Post

धाराशिव जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ! तुळजापूरच्या नवोदय विद्यालयातील दोन कर्मचाऱ्यांच्या घरांत घरफोडी

ताज्या बातम्या

श्री सिद्धिविनायक मल्टिस्टेटचा राष्ट्रीय स्तरावर गौरव‘एक्सलन्स इन बिझनेस ग्रोथ’ पुरस्काराने सन्मानित

श्री सिद्धिविनायक मल्टिस्टेटचा राष्ट्रीय स्तरावर गौरव‘एक्सलन्स इन बिझनेस ग्रोथ’ पुरस्काराने सन्मानित

November 19, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ! तुळजापूरच्या नवोदय विद्यालयातील दोन कर्मचाऱ्यांच्या घरांत घरफोडी

November 19, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

कळंब : शेतीच्या वादातून भावास बांबूच्या काठीने बेदम मारहाण

November 19, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : शहरातील शाहू नगर परिसरातून ३४ वर्षीय तरुणाचे अज्ञातांकडून अपहरण

November 19, 2026
कळंब – मोबाईलवर गेम खेळू न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून १६ वर्षांच्या मुलीची आत्महत्या

उमरगा : मोबाईल चोरीचा आळ घेत मारहाण व जीवे मारण्याची धमकी

November 19, 2026

Recent Posts

  • श्री सिद्धिविनायक मल्टिस्टेटचा राष्ट्रीय स्तरावर गौरव‘एक्सलन्स इन बिझनेस ग्रोथ’ पुरस्काराने सन्मानित
  • धाराशिव जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ! तुळजापूरच्या नवोदय विद्यालयातील दोन कर्मचाऱ्यांच्या घरांत घरफोडी
  • कळंब : शेतीच्या वादातून भावास बांबूच्या काठीने बेदम मारहाण
  • धाराशिव : शहरातील शाहू नगर परिसरातून ३४ वर्षीय तरुणाचे अज्ञातांकडून अपहरण
  • उमरगा : मोबाईल चोरीचा आळ घेत मारहाण व जीवे मारण्याची धमकी
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!