नळदुर्ग : आरोपी नामे-सुभाष हारिबा भोसले, वय 65 वर्षे, 2) पदमाकर श्रीपती भोसले, वय 45 वर्षे, दोघे रा. गंधोरा ता. तुळजापूर, 3) श्री.एस.एन पांचाळ, वय 55 वर्षे, तत्कालीन ग्रामसेवक गंधोरा सध्या पंचायत समिती उमरगा ता. उमरगा, 4) आरुणा दत्ता कुलकर्णी तलाठी गंधोरा सध्या रा. पेशवे हॉस्पिटल शेजारी हाडको तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी फिर्यादीची बहिण नमे- मनिषा महेश गवळी हिचा विवाह गंधोरा येथील महेश सुभाष गवळी(भोसले) याचे सोबत झाला होता.
महेश हा अपघातात मयत झाल्याने नमुद आरोपींनी त्याचे खोटे बनावट मृत्यु प्रमाणपत्र व वारस प्रमाणपत्र तयार करुन त्यांचे नावावरील जमीन गट नं 96 पैकी 85 आर शेती यास वारस लावण्याकरीता बनावट दस्तऐवज तयार फेरफार क्र 2596 हा बेकायदेशीर रित्या मंजूर करुन फिर्यादीची बहिण मनिषा भोसले यांची फसवणुक करुन आर्थिक नुकसान केले. अशा मजकुराच्या मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी तुळजापूर यांचे आदेश क्र फौ.प्र.सं. 156(3) प्रमाणे फिर्यादी नामे-आनंदा शिंदे, वय 48 वर्षे, रा. येवती ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.22.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे 409, 420, 467, 167, 468, 474, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
चोरीचे तीन गुन्हे दाखल
मुरुम : दि. 21.03.2024 रोजी 23.00 ते दि. 22.03.2024 रोजी 06.00 वा. सु. आष्टा कासार येथील जिल्हा परिषद शाळाचे कुलूप अज्ञात व्यक्तीने कुलूप तोडून आत प्रवेश करुनएक लॅपटॉप, ब्रदर प्रिंटर, एलईडी टि व्ही. गॅस सिलेंडर, टुल्स किट, जर्मनचे पतले असा एकुण 43,200₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- एकनाथ नरसोबा शिंदे, वय 49 वर्षे, मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा आष्टा कासार ता. लोहारा जि. धाराशिव यांनी दि.22.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पो. ठाणे येथे 461, 380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
नळदुर्ग :फिर्यादी नामे- वसीम अहेमद हुसन कुरेशी, वय 36 वर्ष, रा. व्यास नगर नळदुर्ग ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचा अंदाजे 40,000 ₹ किंमतीचा वन प्लस 10 टी कंपनीचा मोबाईल फोन हा दि. 24.01.2024 रोजी 19.00 वा. सु. लक्ष्मीण् चौक होर्टी येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- वसीम कुरेशी यांनी दि.22.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
वाशी :दि. 27.02.2024 रोजी 02.55 वा. पुर्वी यशवंडी शिवारातील रिनीव पॉवर कंपनीचे पॉईट नं 348 प्लॅटवर पवन चक्कीचे आतमधील केबल वायर अंदाजे 5,07,000 ₹ चा अज्ञात व्यक्तीने माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-अमोल अश्रुबा मोटे, वय 39 वर्षे, व्यवसाय खाजगी नोकरी सिक्युरीटी गार्ड रा. गिरवली ता. भुम जि. धाराशिव यांनी दि.22.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.