• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, June 17, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

कळंबमध्ये बार्शीच्या टोळक्याचा राडा; हॉटेलमध्ये तोडफोड करत रोकड लुटली

तरुणाला मारहाण करून सोन्याची साखळीही पळवली

admin by admin
March 16, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार
0
SHARES
3.4k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

कळंब : हॉटेलच्या किचनमध्ये घुसून परस्पर काजू आणि शेंगदाणे खाणाऱ्या व्यक्तीला ‘ऑर्डर देऊन टेबलवर मागा’ असे सांगितल्याच्या रागातून बार्शी येथील एका टोळक्याने कळंब शहरातील प्रेरणा बार अँड हॉटेलमध्ये मोठा राडा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपींनी हॉटेल कामगारांना दगडाने मारहाण करत तोडफोड केली आणि गल्ल्यातील १५ हजार रुपयांची रोकड लुटली. त्यानंतर याच टोळक्याने रस्त्यावरून जाणाऱ्या एका तरुणाला बेदम मारहाण करत त्याची साडेतीन तोळ्याची सोन्याची साखळी हिसकावून नेली. या दोन्ही घटना शनिवारी (ता. १४) भरदुपारी घडल्या असून, याप्रकरणी रविवारी (ता. १५) कळंब पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

किचनमध्ये घुसून वाद आणि हॉटेलमध्ये तोडफोड

पहिल्या घटनेत ओमकार ऊर्फ गणेश सुभाष पाटील (वय ३६, मूळ रा. बार्शी, सध्या रा. प्रेरणा हॉटेल, कळंब) यांनी फिर्याद दिली आहे. ओमकार हे कळंब-परळी रोडवरील हॉटेल प्रेरणा बारमध्ये आचारी (वस्ताद) म्हणून काम करतात. शनिवारी दुपारी अडीच वाजेच्या (१४.३५ वा.) सुमारास एक व्यक्ती हॉटेलच्या किचनमध्ये आला आणि परस्पर काजू, खोबरे व शेंगदाणे खाऊ लागला. त्यावेळी ओमकार यांनी त्याला, “तुम्हाला काय हवे असेल ते ऑर्डरमध्ये द्या, मी टेबलवर आणून देतो,” असे सांगितले.

याचाच राग आल्याने आरोपी सागर साळुंके, अनिल साळुंके आणि त्यांच्या सोबतच्या इतर आठ जणांनी (सर्व रा. बार्शी, जि. सोलापूर) बेकायदेशीर जमाव जमवून ओमकार यांच्यासह हॉटेलमधील दुसरे कामगार परमेश्वर तांबारे यांना शिवीगाळ केली व लाथाबुक्क्यांनी आणि दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केले. तसेच हॉटेलमधील काचेचे ग्लास आणि ग्रिल फोडून ८ हजार रुपयांचे नुकसान केले. मॅनेजरची गच्ची धरून काउंटरमधील १५ हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने चोरून नेली व दारूचे बिल न देताच तेथून पळ काढला. याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रार देण्यासाठी जाणाऱ्या तरुणाला लुटले

हॉटेलमध्ये राडा केल्यानंतर याच टोळक्याने काही वेळातच दुपारी तीन वाजेच्या सुमारास दुसरी घटना घडवली. प्रेरणा हॉटेलसमोरून जावळे नगरकडे जाणाऱ्या रोडवर शशांक श्रीकांत मोदी (वय ३४, रा. सावरगाव, ता. कळंब) हे जात होते. यावेळी आरोपी सागर साळुंके, अनंत ऊर्फ दादासाहेब पवार आणि इतर चार अनोळखी व्यक्तींनी (सर्व रा. बार्शी) विनाकारण शशांक यांना अडवून शिवीगाळ केली आणि काठी व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले.

या प्रकाराची पोलिसांत तक्रार देण्यासाठी शशांक जात असताना, आरोपींनी रस्त्यात त्यांची स्कूटी अडवली. गच्चीस धरून त्यांच्या गळ्यातील तब्बल साडेतीन तोळ्यांची सोन्याची साखळी जबरदस्तीने तोडून घेतली आणि जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी शशांक मोदी यांच्या तक्रारीवरून कळंब पोलिसांत चोरी आणि मारहाणीचा दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकाच टोळक्याने भरदुपारी कळंब शहरात राडा करत दहशत माजवल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या दोन्ही प्रकरणांचा अधिक तपास कळंब पोलिस करत आहेत.


Previous Post

मागील भांडणाची चर्चा करण्यास गेलेल्या तरुणांवर टोळक्याचा जीवघेणा हल्ला;

Next Post

कांदा परस्पर विकल्याच्या रागातून तरुणावर तलवार, कोयत्याने हल्ला; अमृतवाडी येथील घटना, दोघांवर गुन्हा दाखल

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

कांदा परस्पर विकल्याच्या रागातून तरुणावर तलवार, कोयत्याने हल्ला; अमृतवाडी येथील घटना, दोघांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

१२ वाड्यांचा धनी ते दत्तक पाटील!

धाराशिवमध्ये मोठा ब्लास्ट! ओमराजेंच्या एन्ट्रीने आमदार राणा पाटलांची ‘कोंडी’; तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागणार?

June 17, 2026
लोहारा परिसरात जुगार अड्ड्यांवर छापेमारी; १२ जण ताब्यात, ९.४ लाखांचा मुद्देमाल जप्त

लोहारा परिसरात जुगार अड्ड्यांवर छापेमारी; १२ जण ताब्यात, ९.४ लाखांचा मुद्देमाल जप्त

June 17, 2026
तरुणांना रोजगाराच्या अनगिनत संधी उपलब्ध करून देणारा अंतरिम अर्थसंकल्प – आ.राणाजगजितसिंह पाटील

बडा धमाका: ‘ऑपरेशन टायगर’ फत्ते? ओमराजे निंबाळकर हाती धनुष्यबाण घेणार, शिंदे गटात एन्ट्री कन्फर्म!

June 17, 2026
सुप्रीम कोर्टाचा आदेश: पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल लवकरच

पवनराजे निंबाळकर हत्याकांड – निकाल का लांबला? कोर्ट ऑर्डरमधून आले समोर; ‘हे’ ठरले कारण …

June 16, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात बाईक चोरांचा धुमाकूळ! भूम, तामलवाडी आणि कळंबमधून ३ दुचाकी लंपास; पोलिसांत गुन्हे दाखल

June 16, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group