• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, September 23, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

कांदा परस्पर विकल्याच्या रागातून तरुणावर तलवार, कोयत्याने हल्ला; अमृतवाडी येथील घटना, दोघांवर गुन्हा दाखल

admin by admin
March 16, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर : स्वतःचा कांदा मध्यस्थांमार्फत न विकता परस्पर विकल्याच्या रागातून एका २७ वर्षीय तरुणावर तलवार आणि कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना तुळजापूर तालुक्यातील अमृतवाडी येथे घडली. शनिवारी (ता. १४) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी रविवारी (ता. १५) तुळजापूर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध शस्त्रास्त्र कायद्यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विकास बापू गंधोरे (वय २७, रा. अमृतवाडी, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) असे या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांच्या वैद्यकीय जबाबावरून पोलिसांनी कारवाई केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास गंधोरे हे आपला कांदा आरोपींच्या माध्यमातून न विकता स्वतः परस्पर विक्री करत होते. याचाच राग आरोपी किरण दयानंद चितळे आणि रवी दयानंद चितळे (दोघेही रा. अमृतवाडी, ता. तुळजापूर) यांच्या मनात होता.

याच कारणावरून शनिवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास आरोपींनी विकास यांना अमृतवाडी येथे गाठले. त्यांना शिवीगाळ करत सुरुवातीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर रागाच्या भरात आरोपींनी थेट तलवार आणि कोयत्याने वार करून विकास यांना गंभीर जखमी केले.

या हल्ल्यानंतर जखमी विकास गंधोरे यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. त्यांनी रविवारी (ता. १५) पोलिसांना दिलेल्या वैद्यकीय जबाबावरून तुळजापूर पोलिस ठाण्यात किरण चितळे आणि रवी चितळे या दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ११८(१), ३(५) सह भारतीय हत्यार कायदा (Arms Act) कलम ४/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास तुळजापूर पोलिस करत आहेत.


Previous Post

कळंबमध्ये बार्शीच्या टोळक्याचा राडा; हॉटेलमध्ये तोडफोड करत रोकड लुटली

Next Post

कळंब: डिकसळ येथून १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
पुण्यातून अपहरण झालेल्या दोन वर्षीय चिमुकलीची सुटका

कळंब: डिकसळ येथून १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यात राडा: ठाकरे गट आणि भाजप आमनेसामने, पोलिसांकडून सौम्य बळाचा वापर

धाराशिवमध्ये मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यात राडा: ठाकरे गट आणि भाजप आमनेसामने, पोलिसांकडून सौम्य बळाचा वापर

September 23, 2026
धाराशिवमध्ये वाद पेटला! ZP अध्यक्षांच्या हट्टापायी उभारलेली ‘ती’ वादग्रस्त भिंत ठाकरे सेनेने पाडली

धाराशिवमध्ये वाद पेटला! ZP अध्यक्षांच्या हट्टापायी उभारलेली ‘ती’ वादग्रस्त भिंत ठाकरे सेनेने पाडली

September 22, 2026
देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद

देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद

September 22, 2026
शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

उद्घाटनाचा नारळ फुटला, पाणी मात्र गायब; दानवेंनी विचारताच ‘राणा दादां’ना झोंबली मिरची!

September 21, 2026
शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

September 21, 2026

Recent Posts

  • धाराशिवमध्ये मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यात राडा: ठाकरे गट आणि भाजप आमनेसामने, पोलिसांकडून सौम्य बळाचा वापर
  • धाराशिवमध्ये वाद पेटला! ZP अध्यक्षांच्या हट्टापायी उभारलेली ‘ती’ वादग्रस्त भिंत ठाकरे सेनेने पाडली
  • देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद
  • उद्घाटनाचा नारळ फुटला, पाणी मात्र गायब; दानवेंनी विचारताच ‘राणा दादां’ना झोंबली मिरची!
  • शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!