तुळजापूर : फिर्यादी नामे-सुधाकर शिवाजी कांबळे, वय 55 वर्षे, रा. बारुळ ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचे राहात्या घराला कुलूप अज्ञात व्यक्तींने दि. 26.03.2024 रोजी 09.30 ते 13.30 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन कपाटातील 27 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम 7,000 असा एकुण 72,000₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे सुधाकर कांबळे यांनी दि.27.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे 454, 380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव : फिर्यादी नामे-फैसल फकीर शेख, वय 27 वर्षे, रा. तालीम खाजानगर धाराशिव ता. जि. धाराशिव यांची अंदाजे 30,000₹ किंमतीची हिरो होंन्डा स्प्लेडंर कंपनीची मोटरसायकल क्र एमएच 26 एम 4235 ही दि. 03.01.2024 रोजी 18.00 वा. सु. ते दि. 06.01.2024 रोजी 11.00 वा. सु. बसस्थानक धाराशिव येथील पार्कींग मधून अज्ञात आरोपीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे सुधाकर कांबळे यांनी दि.27.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.