धाराशिव – सोशल मीडियावरील वादग्रस्त पोस्ट आणि होळीच्या धुलिवंदनावरून धाराशिव शहरातील गणेशनगर , खाजानगर भागात सोमवारी ( २५ मार्च ) रात्री दोन गट आमनेसामने आले होते. दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक करून, शांततेला गालबोट लावले तसेच पोलीस आल्यानंतर त्यांच्यावरही दगडफेक करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी जवळपास दोनशे लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गंभीर गुन्ह्यात शासकीय पंच उपलब्ध करुन न दिल्यामुळे समाज कल्याण विभागाचे सहा. आयुक्त बी.जी. अरवत यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंभीर गुन्ह्यात शासकीय पंच उपलब्ध करुन न देणाऱ्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल होण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे.
आरोपी नामे-1)वसीम दस्तगीर शेख, 2) हज्जु शेख, रा. तालीम गल्ली, 3) अमीर उर्फ हमदू शेख, 4) मोहसीन शेख, 5) फैय्याल ईस्माईल काझी, 6) जमीर सिटी फर्निचरवाला, 7) हाजी मलंग सत्तार सय्यद उर्फ निहाल, 8) नवीद शेख रा. खाजानगर गल्ली नं 19 धाराशिव, 9) अरबाज पठाण रा. एकमिनार मस्जीदजवळ, 10) आलीम कुरेशी, 11) अरबाज शेख, 12) सलीम शेख लिमरा हॉटेलवाला, 13) गौस शेख यांचे सह 100 ते 125 इसम सर्व रा. खाजा नगर धाराशिव, 14) सागर भांडवले, 15) सौरभ काकडे, 16) निलेश साळुंके, 17) हनुमंत यादव, 18)ओमकार शामराव कोरे, 19)विनय, 20) बापू देशमुख, 21) राहुल बबन भांडवले, 22) राज निकम, 23) मनोज जाधव व यांचे सह 70 ते 80 इसम सर्व रा. गणेश नगर धाराशिव यांनी दि. 25.03.2024 रोजी 20.45 वा. सु. गणेश नगर धाराशिव येथे बेकायदेशीर जमाव जमवून त्यांना त्यांचा जमाव हा बेकायदेशीर असुन तेथुन शांततेत निघून जाण्याबाबत समजावून सांगूनही तेथुन निघून न जाता दगड, विटा, फरशीच्या तुकडे व काचेच्या बाटल्या एकमेकांवर पोलीस पथकावर व खाजानगर आणि गणेशनगर परिसरातील राहणारे नागरिकांवर जिवे मारण्याच्या उद्देशाने दगडफेक करुन शासकीय वाहन व जनतेच्या वाहनांचे नुकसान केले व आरडा ओरडा व शिवीगाळ केल्याने जनतेत दहशत निर्माण झाली. तसेच कर्तव्यावरील पोलीस अंमलदार यांना जखमी करुन शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-संदिप ओहोळ पोलीस उप निरीक्षक नेमणुक धाराशिव शहर पोलीस ठाणे यांनी दि.26.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो. ठाणे येथे 307, 353, 332, 143, 147, 148, 149, 336, 109, 504, 506, भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस ठाणे धाराशिव शहर येथे दि. 25.03.2024 रोजी जिवे मारण्याचा प्रयत्न व हिंदु मुस्लीम जातीय दंगलीचा गंभीर गुन्हा दाखल असलेल्याने गुन्ह्याचे घटनास्थळ पंचनामा व जप्ती पंचनामा करणे कामी दोन शासकीय पंच उपलबध् करुन देणे बाबत मुलत: असे कर्मचारी पुरविण्याबाबत तरतुद नसल्याचे पत्र देवून शासकीय पंच पुरविले नाही. गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने व शासनाचे आदेश असताना सुध्दा यातील आरोपी नामे- सहा. आयुक्त बी.जी. अरवत समाज कल्याण कार्यालय धाराशिव यांनी शासकीय पंच पुरविले नाही. व जिल्हाधिकारी सो यांचे आदेशाचे अवमान करुन उल्लघंन केले.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे दिनेश उत्तमराव जाधव सपोनि पोलीस ठाणे धाराशिव यांनी दि.28.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो. ठाणे येथे 188, 187 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.