कळंब : फिर्यादी नामे- शरद रामचंद्र जाधवर, वय 39 वर्षे, रा. गणेश नगर परळी रोड, कळंब ता. कळंब जि. धाराशिव यांचे राहाते घराचा संशईत आरोपी नामे- नामदेव बाबासाहेब गडदे, वय 28 वर्षे, 2) महादेव छगन धायगुडे, वय 24 वर्षे, दोघे रा. चिंचखंडी ता. अंबाजोगाई जि. बिड यांनी दि. 30.03.2024 रोजी 00.30 ते 01.30 वा. सु.कडी कोंडा तोडून आत प्रवेश करुन घरातील फिर्यादीच्या संस्थेचे महत्वाचे कागदपत्र व विद्यार्थ्यांचे मुळ कागदपत्रास आग जावून जाळून टाकून कपाटातील रोख रक्कम 13,000₹ चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे शरद जाधवर यांनी दि.31.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे 457, 380, 436 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे. सदर गुन्ह्याच्या तपासा दरम्यान फिर्यादीने दिलेल्या माहितीवरुन कळंब पोलीसांनी नमुद आरोपीस ताब्यात घेवून सदर गुन्ह्या बाबत विचार पुस केली असता नमुद आरोपींनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. यावरुन पोलीसांनी दोन्ही आरोपीस अटक केली असुन गुन्ह्याचा तपास सुर आहे.
येरमाळा : फिर्यादी नामे-उपाबाई महादेव जाधवर, वय 64 वर्षे, रा. रत्नापूर ता. कळंब जि. धाराशिव यांचे राहाते घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 30.03.2024 रोजी 11.30 ते 16.00 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन घरातील कपाटातील 233 ग्रॅम सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने व रोख रक्कम 6,76,075 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे उपाबाई जाधवर यांनी दि.31.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो. ठाणे येथे 454, 380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
आंबी : फिर्यादी नामे-पंडीत महादेव वारे, वय 46 वर्षे, रा. आनाळा ता. परंडा जि. धाराशिव यांचे राहाते घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 30.03.2024 रोजी 14.30 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन घरातील कपाटातील 60 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने एकुण 2,14,000₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे पंडीत वारे यांनी दि.31.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आंबी पो. ठाणे येथे 457, 380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.