मुरुम :आरोपी नामे-1)अम्रता देवराव चव्हाण, 2) अशोक अम्रता चव्हाण, 3) सुनिता अशोक चव्हाण, 4) सुशिल उर्फ पिलाजी अम्रता चव्हाण, 5) गिता पिलाजी चव्हाण, 6) विनोद धारु राठोड, 7) ज्योती विनोद राठोड, 8) पुतळाबाई अम्रता चव्हाण सर्व रा. नाईकनगर सुं. 9) प्रताप किसन पवार, 10) ताई प्रताप पवार, दोघे रा.अंबरनगर तांडा मुरुम ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.31.03.2024 रोजी 20.00 वा. सु. नाईकनगर सुं. येथे फिर्यादी नामे- लक्ष्मण देवराव चव्हाण, वय 71 वर्षे, रा. नाईकनगर सुं ता. उमरगा जि. धाराशिव यांना मागील भांडणाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लाकडी काठी, दगड, चाकूने मारहाण करुन जखमी केले. तसेच फिर्यादीचा मुलगा नितीन यास चाकूने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे लक्ष्मण चव्हाण यांनी दि.31.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो. ठाणे येथे 143, 147, 148, 149, 336, 324, 323, 504, 506 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
नळदुर्ग :आरोपी नामे-1)नितीन शिवाजी बागडे, रा. केशेगाव ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 30.03.2024 रोजी 22.00 वा. सु. केशेगाव ता. तुळजापूर येथे फिर्यादी नामे- हरीबा मेघराज बागडे, वय 75 वर्षे, रा. केशेगाव ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना रामफळ देण्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे हरीबा बागडे यांनी दि.31.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे 324, 323, 504, 506 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
मद्यपी चालकावर गुन्हा दाखल
परंडा : आरोपी नामे-1)बापू संदीपान मोरे, वय 37 वर्षे, रा. मुंगशी माढा ता. माढा जि. सोलापूर हे दि.31.03.2024 रोजी 19.45 वा. सु. आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्र एमएच 45 जे 2240 ही मिलन हॉटेल समोर परंडा येथे रोडवर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द परंडा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
सार्वजनिक ठिकाणी निष्काळजीपनाचे कृत्य करणाऱ्यांवर गुन्हे दाखल
शिराढोण : आरोपी नामे 1) ओंकार सिध्देश्वर म्हस्के, रा. गोविंदपुर ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि. 31.03.2024 रोजी 13.00 वा. सु. गोविंदपुर पाटी येथे रोडचे बाजूला सार्वजनिक ठिकाणी येथे रोडलगत आपपल्या हॉटेलमध्ये गॅस शेगडीत निष्काळजीपने अग्नी प्रज्वलीत करत असताना शिराढोण पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भा.दं.सं. कलम- 285, अन्वये शिराढोण पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.