धाराशिव : धाराशिव शहर आणि जिल्ह्यात शालेय मुले पळवणारी टोळी पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे. मागील एक महिन्यात जिल्हाभरातील किमान सात ते आठ शालेय मुलांना फूस लावून पळवण्यात आले आहे. परंतु या टोळीचा शोध लावण्यात पोलिसाना अपयश आले आहे.
फिर्यादी नामे-आनंत वामन उबाळे, वय 48 वर्षे, रा. वरवंटी ता. जि. धाराशिव यांचा मुलगा नामे- पियुश आनंत उबाळे, वय 16 वर्षे, रा. वरवंटी ता. जि. धाराशिव यास दि. 05.04.2024 रोजी 03.00 ते सांयकाळी 05.00 वा. सु. वरवंटी ते धाराशिव येथील ताजमहल टॉकीज चे जवळून अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी पळवून नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे आनंद उबाळे यांनी दि.05.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो. ठाणे येथे 363 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
हाणामारीचे तीन गुन्हे दाखल
नळदुर्ग :आरोपी नामे-1) मारुती रघुनाथ बंदपट्टे, रा. अणदुर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.04.04.2024 रोजी 21.00 वा. सु. वडरगल्ली अणदुर येथे फिर्यादी नामे- सुनिता सुधाकर बंदपट्टे, वय 47 वर्षे, रा. वडरगल्ली अणदुर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने काही एक कारण नसताना गळ्यावर व उजवे गालावर ब्लेडने मारुन गंभीर जखमी केले. फिर्यादीचे पती सुधाकर बंदपट्टे सोडविण्यास आले असता त्यांनाही कानावर मानेवर मारुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे सुनिता बंदपट्टे यांनी दि.05.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे 325 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा :आरोपी नामे-1)गंगाप्रसाद बबन आईनले, 2)बबन शिवराज आईनले,3) गंगासागर बबन आईनले, 4)गुड्डी बबन आईनले सर्व रा. गुंजोटी ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि. 03.04.2024 रोजी सायंकाळी 19.00 वा. सु. गुंजोटी येथे फिर्यादी नामे- पवन रामचंद्र सगर, वय 30 वर्षे, रा. सुंदरवाडी ता. उमरगा जि. धाराशिव यांना आमचे घरी आजीला घेवून जाण्यासाठी का आलास या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉडने मारहाण करुन गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे सुनिता बंदपट्टे यांनी दि.05.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे 326, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
भुम :आरोपी नामे-1)दत्ता शिंदे, 2) शहाजी शिंदे, 3) सुमन शिंदे, 4) नितीन शिंदे, रा. कसबा, 5) राहुल गायकवाड रा इंदिरानगर ता. भुम जि. धाराशिव यांनी दि.04.04.2024 रोजी 03.48 वा. सु. कसबा ता. भुम येथे फिर्यादी नामे- संतोष दिगंबर पोळ, वय 26 वर्षे, रा. कसबा भुम ता. भुम जि. धाराशिव यांना नमुद आरोपीनी मागील भांडणाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, सतुर, दगडाने मारहाण करुन जखमी केले. फिर्यादीचा भाउ भांडण सोडवण्यास आले असता त्यांनाही शिवीगाळ करुन सतुरने नाकावर मारुन जखमी केले.व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे संतोष पोळ यांनी दि.05.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो. ठाणे येथे 324, 323, 504, 506, 143, 147, 148, 149 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव :आरोपी नामे-1) नंदा नाना गायकवाड, 2) निलम मेघराज शेंडगे, 3) मेघराज शेंडगे रा. कुरणेनगर धाराशिव ता. जि. धाराशिव यांनी दि. 03.04.2024 रोजी 22.00 वा. सु. हुंबे यांचे धरासमोर कुरणेनगर धाराशिव येथे फिर्यादी नामे- सचिन परमेश्वर तिंडोरे, वय 33 वर्षे, रा. भालगाव ता. बार्शी जि. सोलापूर यांना नमुद आरोपींनी शेतीच्या वादाचे कारणावरुन शिवीगाळ करुन चप्पल व दगडाने मारहाण केली. तसेच फिर्याची पत्नी पुनम ही भांडण सोडवण्यास गेली असता त्यांनाही नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे सचिन तिंडोरे यांनी दि.04.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो. ठाणे येथे 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
ढोकी:आरोपी नामे-1)अकुंश लिंबराज चव्हाण, 2) अजिंक्य अंकुश चव्हाण रा. गोपाळवाडी ता.जि. धाराशिव यांनी दि. 03.04.2024 रोजी 20.00 वा. सु. गोपळावाडी शिवार शेत गट नं 72/02 मधील शेतात फिर्यादी नामे- ननासाहेब दिलीप चव्हाण, वय 29 वर्षे, रा. गोपाळवाडी ता. जि. धाराशिव यांना शेतीचे वादाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, खोऱ्याच्या दांड्याने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे नानासाहेब चव्हाण यांनी दि.04.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.