शिराढोण :आरोपी नामे-1) समाधान उर्फ (मिटु) अमृत मुंडे, 2) दिलीप बन्सी मुंडे दोघे रा. गोविंदपुर ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.09.04.2024 रोजी 21.00 वा. सु. गोविदपुर येथील पारधी वस्ती जवळ फिर्यादी नामे-विकास तुकाराम वटाणे, वय 33 वर्षे, रा. गोविंदपुर ता. कळंब जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी पैसे न दिल्याचे कारणावरुन जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, खिशातुन चाकु काढुन मारहाण करुन जखमी केले.माझी कुठे तक्रार केली तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे विकास वटाणे यांनी दि.10.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन शिराढोण पो. ठाणे येथे 307, 384, 341, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
आंबी :आरोपी नामे- 1) शंकर सुदाम गांगर्डे रा. शेळगाव, ता. परंडा जि. धाराशिव यांनी दि. 09.04.2024 रोजी 11.30 वा. सु. ग्रामपंचायत कार्यालय शेळगाव येथे फिर्यादी नामे- बाबुराव रंगनाथ दैन वय 59 वर्षे, रा. ग्रामपंचायत लिपीक कार्यालय शेळगाव ता. परंडा जि. धाराशिव यांना पाणी सोडण्याचे कारणावरुन ग्रामपंचायत कर्यालयाला कुलुप लावले त्यामुळे ग्रामपंचायत कर्यालयाचे कामकाज थांबले आहे. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- बाबुराव दैन यांनी दि.10.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आंबी पो. ठाणे येथे 186, 341 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.