• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, August 7, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

भूममध्ये बंद घर फोडले; सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह ९८ हजारांचा मुद्देमाल लंपास

श्रीशंकर नगर येथील घटना; स्वयंपाकघरातील डब्यात ठेवलेले दागिने पळवले

admin by admin
March 18, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

भूम :  भूम शहरातील श्रीशंकर नगर भागात एका बंद घराचे गेट उघडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि मोबाईल असा तब्बल ९८ हजार ७०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घरफोडी सोमवारी (ता. १६) सकाळी ते मंगळवारी (ता. १७) पहाटेच्या दरम्यान घडली. याप्रकरणी भूम पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायण दत्तोबा नाईकनवरे (वय ३२, रा. श्रीशंकर नगर, भूम, जि. धाराशिव) यांचे घर बंद असल्याचे हेरून चोरट्यांनी डल्ला मारला. सोमवारी सकाळी ११ ते मंगळवारी पहाटे साडेतीन वाजेच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने त्यांच्या बंद घराचे मुख्य गेट उघडून आत प्रवेश केला.

घरामध्ये प्रवेश केल्यानंतर चोरट्यांनी सामानाची उचकापाचक केली. यावेळी स्वयंपाकघरातील एका डब्यात ठेवलेले २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने आणि एक मोबाईल फोन चोरट्यांच्या हाती लागला. हा सर्व ९८ हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून त्यांनी पोबारा केला. चोरीचा हा प्रकार लक्षात आल्यानंतर नारायण नाईकनवरे यांनी तत्काळ भूम पोलिस ठाण्यात धाव घेऊन प्रथम खबर दिली.

या फिर्यादीवरून पोलिसांनी मंगळवारी (ता. १७) अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३३१(४) आणि ३०५ अन्वये घरफोडीचा गुन्हा नोंदवला आहे. भरवस्तीत झालेल्या या चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली असून, भूम पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत.


Previous Post

उमाचीवाडीत ६० वर्षीय वृद्धाला बेदम मारहाण; सहा जणांवर गुन्हा दाखल

Next Post

कत्तलीसाठी गोवंशीय जनावरांची निर्दयी वाहतूक; धाराशिव पोलिसांची कारवाई, सव्वाचार लाखांचा मुद्देमाल जप्त

Next Post
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

कत्तलीसाठी गोवंशीय जनावरांची निर्दयी वाहतूक; धाराशिव पोलिसांची कारवाई, सव्वाचार लाखांचा मुद्देमाल जप्त

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन

उपनगराध्यक्ष पदाचा घोळ, नाकापेक्षा जड मोती आणि १४० कोटींच्या पंचपक्वान्नात नगरसेवक उपाशी!

August 7, 2026
१२ वाड्यांचा धनी ते दत्तक पाटील!

नियतीचा खेळ आणि संघाची खेळी: एका राजकीय वर्चस्वाची ‘इनसाईड स्टोरी’

August 7, 2026
पंतप्रधान मोदींची भेट घेत ओमराजे निंबाळकरांनी मांडल्या धाराशिवच्या विकासाच्या मागण्या

घर फिरलं की वासे फिरतात! ओमराजेंची ‘दिल्लीवारी’ अन् राणा पाटलांची ‘दुहेरी कात्री’!

August 7, 2026
पंतप्रधान मोदींची भेट घेत ओमराजे निंबाळकरांनी मांडल्या धाराशिवच्या विकासाच्या मागण्या

पंतप्रधान मोदींची भेट घेत ओमराजे निंबाळकरांनी मांडल्या धाराशिवच्या विकासाच्या मागण्या

August 7, 2026
राणा पाटील आणि त्यांच्या ‘बगलबच्चांना’ मुंबई आणि दिल्लीतून एकाच दिवशी दोन मोठे हादरवणारे झटके!

राणेंचा ४ तासांचा ‘लेटमार्क’, बांधावरचे ‘नाट्य’ आणि निष्ठावंतांच्या तोंडाला थेट पाने!

August 7, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!