येरमाळा : आरोपी नामे-1) मामा सासरे शेख फिरोज दस्तगीर, यांची पत्नी 2) शेख शबाना फिरोज, 3) मामा सासरे शेख रफिक दस्तगीर यांची पत्नी 4) शेख शहेनाज रफिक रा. खाजानगर ता.जि. धाराशिव, 5) नवरा सय्यद सोहेल जमील दारुवाले, 6) सासरे सय्यद जमील दारुवाले, 7) सासु सय्यद तसलिम जमील दारुवाले, 8) चुलत सासरे सय्यद मज्जित दारुवाले सर्व रा. तेरखेडा ता. वाशी जि. धाराशिव यांनी दि. 24.04.2024 रोजी 17.00 ते18.00 ते दि. 25.04.2024 रोजी 15.00 वा. सु. राहते घरी तेरखेडा येथे फिर्यादी नामे- अफिया अंजुम पिता इकबाल शेख, वय 23 वर्षे, रा. तेरखेडा ता. वाशी जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी “ तु तुझे माहेरहुन दहा लाख रुपये घेवून ये” असे म्हणुन शिवीगाळ करुन शारिरीक व मानसिक छळ करुन जिवे ठार माण्याच्या उद्देशाने बळजबरीने काहीतरी विषारी औषध पाजले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-अफिया शेख यांनी दि.27.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो. ठाणे येथे 307, 498(अ), 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
आंबी : आरोपी नामे-1)ओंकार विठ्ठल रंदिल, 2) विश्रांता मारुती गायकवाड, 3) रोहित वाल्मिक सावंत, 4) अजय संजय समिंदर, 5) विजुबाई विशाल शिंदे, सर्व रा. भिमनगर आंबी ता. भुम जि. धाराशिव यांनी दि.26.04.2024 रोजी 19.00 वा. सु. रस्त्यावर आंबी येथे फिर्यादी नामे- सुरेश यशवंत गायकवाड, वय 75 वर्षे, रा. भिमनगर आंबी ता. भुम जि. धाराशिव यांच्या दोन मुली काजल व शुभांगी यांना मागील भांडणाचे कारणावरुन नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठी, लोखंडी पाईपने मारहाण करुन जखमी केले. तसेच फिर्यादी हे भांडण सोडवण्यास गेले असता नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन काठी, लोखंडी पाईपने मारुन जखमी केले व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सुरेश गायकवाड यांनी दि.27.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आंबी पो. ठाणे येथे 324, 323, 504, 506, 143, 147, 148, 149 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव : आरोपी नामे-1)रोहीत जाधव, 2) गणेश कदम व इतर पाच इसम यांनी दि.23.04.2024 रोजी 21.00 ते 21.30 वा. सु. यांनी दि. 23.04.2024 रोजी 21.00 ते 21.30 वा. सु.छत्रपती शिवाजी महाराज चौक धाराशिव येथे फिर्यादी नामे- सुनिल पृथ्वीचंद व्होरा, वय 61 वर्षे, रा. टी.पी.एस. कॉर्नर धाराशिव यांना नमुद आरोपींनी बियर मागण्यासाठी येवून फिर्यादीने बियरचे पैसे मागण्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन रिकाम्या बियरच्या बाटलीने डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. तसेच फिर्यादीचा मुलगा हा भांडण सोडवण्यास आला असता नमुद आरोपींनी त्यासही काठीने डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. व फिर्यादीच्या खिशातील रोख रक्कम 38, 500₹ काढून घेतले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- सुनिल व्होरा यांनी दि.27.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो. ठाणे येथे 143, 147, 148, 149, 326, 327, 323, 504, 506, भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
आंबी : आरोपी नामे-1) शुभांगी सुरेश गायकवाड, 2) काजल सुरेश गायकवाड, 3) धनराज सुरेश गायकवाड, 4) सुरेश यशवंता गायकवाड, सर्व रा. भिमनगर आंबी ता. भुम जि. धाराशिव यांनी दि. 26.04.2024 रोजी 18.54 वा. सु. भिमनबर आंबी येथे मारुती गायकवाड यांचे घरासमोर फिर्यादी नामे-ओंकार उर्फ चिक्या विइ्इल रणदिल, वय 19 वर्षे, रा. आंबी त. भुम जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी मागील भांडणाचे कारणावरुन शिवीगाळ कारुन फिर्यादीचे दोन्ही हातावर चावा घेवून जखमी केले. तसेच फिर्याची मामी विश्रांता गायकवाड, मावस भाउ रोहित सावंत, आई कविता रणदिल, हे भांडण सोडवण्यास आले असता त्यांनाही नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. व आजी विजयाबाई शिंदे या घरी गेल्या असता त्यांचे घरात घुसून नमुद आरोपींनी मारहाण केली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- ओंकार रणदिल यांनी दि.27.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आंबी पो. ठाणे येथे 452, 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
कळंब : आरोपी नामे-1)बाबासाहेब वच्छिष्ठ खराटे, 2) परमेश्वर राजेंद्र खराटे, 3) गणेश शिंदे, 4) वच्छिष्ठ जनार्धन खराटे, रा. भोगजी ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि. 26.04.2024 रोजी 20.00 वा. सु. भोगजी येथे फिर्यादी नामे- विकास आबा खराटे, वय 25 रा. भोगजी ता. कळंब जि. धाराशिव यांना अंगावर अक्षदा टाकण्याचे कारणावरुन नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉड(टॉमी), काठी, बुटाने माराहण करुन जखमी केले. फिर्यादीची चुलत भावजय अशाबाई खराटे व बहिण उषा मुंडे या भांडण सोडवण्यास आल्या असता त्यांनाही नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन बुटाने तोंडावर मारुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- विकास खराटे यांनी दि.27.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर : आरोपी नामे-1)शारुख जलाल पठाण, 2) सैफन जलाल पठाण, 3) जलाल चॉद पठाण, सर्व रा. बारुळ ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 26.04.2024 रोजी 21.30 वा. सु. अमजत पठाण यांचे घरासमोर बारुळ येथे फिर्यादी नामे- ख्ंदुलाल ममुल शेख, वय 28 वर्षे, रा. बारुळ ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी उचल दिलेले पैसे मागण्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- चंदुलाल शेख यांनी दि.27.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.