तुळजापूर : फिर्यादी नामे-शरद भागवत हाके, वय 31 वर्षे, रा. देवसिंगा तुळ ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचे पत्रयाचे शेडची पट्टी काडून घरात प्रवेश करुन घरातील खिळ्याला अडकवलेल्या बॅग मधील नविन कपडे व रोख रक्कम अंदाजे 10,000₹ किंमतीचे व इतर महत्वाचे कागदपत्रे दि. 26.04.2024 रोजी 23.00 ते दि. 27.04.2024 रोजी 04.00 वा. सु. देवसिंगा तुळ शिवारातुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- शरद हाके यांनी दि.27.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे 461, 380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
येरमाळा : फिर्यादी नामे-किरण सुभाष सावंत, वय 52 वर्षे, रा. हळदगाव ता. कळंब जि. धाराशिव यांचे राहाते घराचा दरवाजा अज्ञात व्यक्तीने दि. 10.04.2024 रोजी 11.00 ते 16.00 वा. सु.उचकटून घरात प्रवेश करुन घरातील कपाटामध्ये ठेवलेले रोख रक्कम 59,000₹ चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- किरण सावंत यांनी दि.27.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो. ठाणे येथे 454 380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
वाशी : फिर्यादी नामे-अक्षय नवनाथ लावंड, वय 27 वर्षे, रा. पिंपळगाव लिं. ता. वाशी जि. धाराशिव यांचे पिंपळगाव लिंग शिवारातील शेतातील गोठ्याचे पाठीमागील रिकमे जागेत लावलेल्या ट्रॅक्टरची बॅटरी अंदाजे 8,000₹ किंमतीची ही दि. 25.04.2024 रोजी 20.00 ते दि. 27.04.2024 रोजी 07.30 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्याफिर्यादी नामे-अक्षय लावंड यांनी दि.27.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
येरमाळा : फिर्यादी नामे- राजा अंकुश कदम, वय 26 वर्षे, रा. तुळजापूर रोड कदम वस्ती बार्शी ता. बार्शी जि. सोलापूर यांची अंदाजे 30,000 ₹ किंमतीची हिरो एचएफ डिलक्स मोटरसायकल क्र एमएच 13 सीसी 1563 ही दि.24.04.2024 रोजी 11.30 ते दि. 25.04.2024 रोजी 01.00 वा. सु. चुन्याच्या रानात मंदीराच्या पाठीमागून अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्याफिर्यादी नामे- राजा कदम यांनी दि.27.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.