धाराशिव – छत्रपती संभाजीराजे जयंती मिरवणुकीत बेकायदेशीर डॉल्बी डीजे लावून आवाज तीव्रतेपेक्षा व कर्णकर्कश ठेवून ध्वनी प्रदूषण करणे, आवाज कमी करण्यास सांगितले असता, पोलीस कर्मचाऱ्यांशी शिवीगाळ करुन धक्काबुक्की करणे तसेच छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा रोडवर ठेवून राष्ट्रीय महामार्ग बंद करणे प्रकरणी जवळपास १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी नामे- 1) विलास लोकरे, 2) बिरुदेव बनसोडे, 3) प्रथमेश खळदकर, 4) शुभम लोकरे, सर्व रा. इंगळे गल्ली धाराशिव ता.जि. धाराशिव, 5) रोहीत अमर दबडे व इतर 10 ते 12 इसम यांनी दि.14.05.2024 रोजी 18.30 ते 21.00 वा. सु. देशपांडे स्टॅड जवळील गणपती मंदीर समोर रोडवर धाराशिव येथे सन्मित्र समाज तरुण मंडळाचे पदाधिकारी यांनी विनापरवाना छत्रपती संभाजी महाराज यांची मिरवणुक काढून डिजे मोठ्या आवाजात बंदी घातलेले गाणे वाजवून डिजे चा आवाज कमी करण्यास सांगणाऱ्या पोलीस अंमलदार यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. तसेच गैरकायद्याची मंडळी जमवून देशपांडे स्टॅड समोरील जुन्या राष्ट्रीय महामार्गावर ट्रॅक्टर ट्रॉली सह आडवे लावून व छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा रोडवर ठेवून राष्ट्रीय महामार्ग बंद करुन (रास्ता रोको) केला. त्यांना रोडवरुन बाजूला होण्यास तसेच रोडवरुन ट्रॅक्टर ट्रॉली सह छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बाजूला घेण्यास सांगत असताना नमुद आरोपींनी शिवीगाळ, दगडफेक करुन शासकिय कामात अडथळा निर्माण केला. विना परवाना मिरवणुक काढून डिजे लावून जिल्हाधिकारी यांचे आदेशाचे उल्लघंन केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- फिर्यादी नामे-सच्चिदानंद श्रध्दानंद स्वामी, वय 32 पोलीस अंमलदार/1768 नेमणुक पोलीस ठाणे धाराशिव शहर यांनी दि.15.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो. ठाणे येथे कलम 353,332, 153(अ), 143, 147, 149, 323, 504, 188 भा.दं.वि.सं. 135 म.पो.का.अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
रस्ता अपघात
बेंबळी : मयत नामे-केशव गुंडाप्पा सुर्यवंशी, वय 50 रा. ताकविकी ता.जि. धाराशिव हे दि.14.05.2024 रोजी 11.55 वा. सु. ताकविकी ते तोरंबा पाटी येथे एनएच 361 रोडवरुन पायी रस्ता ओलांडत होते. दरम्यान पिकअप वाहन क्र एमएच 26 सीएच 0067 चा चालक नामे- दिंगबर गणपतराव यादव, वय 37 वर्षे, रा. हासुळ ता. कंधार जि. नांदेड यांनी त्यांचे ताब्यातील पिकअप हे हायगई व निष्काळजीपणे चालवून केशव सुर्यवंशी यांना समोरुन धडक दिली. या अपघातात केशव सुर्यवंशी हे गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- समाधान केशव सुर्यवंशी वय 28 वर्षे, रा. ताकविकी ता. जि. धाराशिव यांनी दि.15.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279,304(अ), 337 सह 134 (अ) (ब) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.