धाराशिव : फिर्यादी नामे-तानाजी पंढरीनाथ तानवडे, वय 52 वर्षे, रा. कौडगाव ता. जि. धाराशिव यांचे कौडगाव शिवारातील शेत गट नं 221 मधील केबल अंदाजे 7,000₹ किंमतीचा हा दि. 15.05.2024 रोजी 11.30 वा. सु. अनोळखी तीन व्यक्तीने चोरुन नेला.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- तानाजी तानवडे यांनी दि.15.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो. ठाणे येथे 379,511 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे. गुन्ह्याच्या तपासा दरम्यान फिर्यादीने दिलेल्या माहिती वरुन आरोपी 1) संजय पदमाकर बनसोडे, वय 20 वर्षे, 2) राजरत्न शांतीकुमार कांबळे, वय 19 वर्षे, 3) अभिषेक बळवंत बनसोडे, वय 21 वर्षे सर्व रा. भिमनगर धाराशिव यांना धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पथकाने अटक करुन गुन्ह्याचा पुढील तपास सुरु आहे.
लोहारा : फिर्यादी नामे-रमेश धनसिंग राठोड, वय 65 वर्षे, रा. आनंदनगर तांडा खेड ता. लोहारा जि. धाराशिव यांची अंदाजे 25,000₹ किंमतीची हिरो कंपनीची एचएफ डिलक्स मोटरसायकल विना पासिंग ही दि.08.02.2024 रोजी 23.00 ते दि. 09.02.2024 रोजी 06.00 वा. सु. रमेश राठोड यांच्या राहात्या घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- रमेश राठोड यांनी दि.15.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन लोहारा पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
येरमाळा : दि. 03.05.2024 रोजी 06.00 ते दि. 04.05.2024 रोजी 23.00 वा. सु. बावी शेत शिवार गट नं 1446,1448,1449 मध्ये चालू असलेल्या एव्हररिन्यु एनर्जी प्रा.लि. कंपीनचे कामासाठी लागणारे 1000 किलो वजनाचे तीन नग केबल ड्रम अंदाजे 7,25,000₹ किंमतीचे अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अमोल सुग्रीव घोळवे, वय 26 वर्षे, रा. सोनारवाडी ता. वाशी जि. धाराशिव यांनी दि.15.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
कळंब : फिर्यादी नामे-महादेव बळीराम माने, वय 47 वर्षे, रा. दत्तनगर कळंब ता. र्कळंब जि. धाराशिव यांचे मंगलम ज्वेलर्स मध्ये लहान मुलाचे कुडके दाखवा असे बहाना करुन हातचालाखीने 1.5 ग्रॅमचे सोन्याचे कुडके अंदाजे 12,000 ₹ किंमतीचे हे दि. 15.05.2024 रोजी 20.30 वा. सु. आरोपी नामे- विठ्ठल भालचंद्र सानप, वय 55 वर्षे, रा. राजीव गांधीनगर सिडको संभाजीनगर यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- महादेव माने यांनी दि.15.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे 379,511 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.