कळंब : आरोपी नामे-1) बालाजी दिगंबर सावंत, 2) शिवाजी विश्वनाथ सावंत, 3) मारुती दिगांबर सावंत, 4) श्रीकांत बालाजी सावंत, 5) सरिता बालाजी सावंत, 6) हेमा मारुती सावंत सर्व रा. मस्सा खं ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि. 12.05.2024 रोजी 14.00 वा. सु. मस्सा खं शिवारातील शेत गट नं 5 मधील 29 आर मध्ये फिर्यादी नामे- नारायण ज्ञानोबा सावंत, वय 35 वर्षे, रा. मस्सा खं ता. कळंब जि. धाराशिव यांना शेताच्या वादाचे कारणावरुन नमुद आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, कुह्राडीचे तुंब्याने मारहाण करुन जखमी केली. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- नारायण सावंत यांनी दि.15.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे 324, 323, 143, 147, 148, 504,506 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
शिराढोण : आरोपी नामे-1) राजेंद्र उत्तम सोनवणे, 2) बलराम राजेंद्र सोनवणे, दोघे रा. ताडगाव ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.09.05.2024 रोजी 10.30 वा. सु. ताडगाव येथे शेतात फिर्यादी नामे- भिमराव मनोहर जाधवर, वय 65 वर्षे, रा. ताडगाव ता. कळंब जि. धाराशिव यांना शेतात दगड टाकण्याच्या कारणावरुन नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी पाईप, दगडाने मारहाण करुन गंभीर जखमी केले.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- भिमराव जाधवर यांनी दि.15.05.2024 रोजी दिलेल्या वैद्यकीय जबाबावरुन शिराढोण पो. ठाणे येथे 326, 504,506,34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
बेंबळी : आरोपी नामे-1)किसन दामोदर डावकरे, 2) संतोष वसंत खटके, दोघे रा. नांदुर्गा ता. जि. धाराशिव यांनी दि. 14.05.2024 रोजी 18.00 वा. सु. भंडारी शिवारात हॉटेल जवळ फिर्यादी नामे- सचिन महादेव डावखरे, वय 30 वर्षे, रा. नांदुर्गा ता. जि. धाराशिव यांना प्रचर करण्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन डोक्यात दगडाने मारुन जखमी केले.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- सचिन डावखरे यांनी दि.15.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो. ठाणे येथे 324, 323, 504, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.