धाराशिव – धाराशिव तालुक्यातील करजखेडा येथील एका २३ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला होता. याप्रकरणी मयत तरुणाचा बाप आणि भाऊ यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गजाआड करून खुनाचे गूढ उकलले आहे.
संदेश भाउसाहेब पाटील, वय 23 वर्षे, रा. करजखेडा ता. जि. धाराशिव यांचा दि. 24.05.2024 रोजी करजखेडा येथे त्यांचे राहते घरासमोर ओठ्यावर झोपलेले असताना अज्ञात व्यक्तीने ढोक्यात दगड घालून जिवे ठार मारले. यावरुन बेंबळी पोलीस ठाणे येथे दि. 25.05.2024 रोजी भा.दं. वि. सं. कलम- 302, 34 अन्वये गुन्हा क्र. 129/2024 हा नोंदवला आहे.
सदर गुन्ह्यातील तपासाकरिता पोलीस पथक नेमण्यात आले होते. या पोलीस पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदर मयत नामे संदेश भाउसाहेब पाटील हा घरात नेहमी वडील व भावासोबत जमिनीच्या वाटणीचे कारणावरुन व नवीन चारचाकी कार खरेदीचे कारणावरुन भांडण तक्रारी शिवीगाळ करत होता. त्याचे नेहमीच्या या कारणामुळे वडील व भाउ वैतागले होते. त्याचाच राग मनात धरुन वडील नामे भाउसाहेब गोविंदराव पाटील व भाउ नामे प्रितम भाउसाहेब पाटील या दोघांनी संगणमत करुन दि. 24.05.2024 रोजीचे मध्यरात्रीचे सुमारास मयत नामे संदेश भाउसाहेब पाटील हा राहते घरासमोरील ओट्यावर झोपला असताना त्यास झोपेतच डोक्यात दगड घालून जीवे ठार मारले आहे.अशी खात्रीशीर माहिती मिळल्यावरुन पथकाने नमुद आरोपी वडील नामे- 1)भाउसाहेब गोविंदराव पाटील, 2) भाउ नामे- प्रितम भाउसाहेब पाटील रा. करजखेडा ता. जि. धाराशिव यांना ताब्यात घेवून नमुद आरोपीकडे सदर गुन्ह्या संदर्भात चौकशी केली असता सदरचा गुन्हा आम्हीच केला आहे अशी कबुली दिल्याने त्यांना ताब्यात घेवून पुढील कार्यवाही कामी पो स्टे बेंबळी येथे हजर केले.