• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, April 21, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

नळदुर्ग किल्ल्यात सेल्फीचा मोह नडला

नवविवाहित तरुणीचा हकनाक बळी

admin by admin
May 28, 2024
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
नळदुर्ग किल्ल्यात सेल्फीचा मोह नडला
0
SHARES
3k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

नळदुर्ग – नळदुर्गच्या भुईकोट किल्ल्यातील उपल्या बुरुजावर सेल्फी घेताना तोल जावून पडल्याने एका नवविवाहित तरुणीचा आज मृत्यू झाला आहे.निलोफर अमीर शेख ( वय २२ ) रा. हंगरगा (तूळ) ता. तुळजापूर असे या मृत तरुणीचे नाव आहे. चार दिवसापूर्वीच या तरुणीचे लग्न झाले आहे. नवऱ्यासोबत फिरायला आल्यानंतर ही दुर्घटना घडली आहे.

तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग किल्ला पर्यटकांचे आकर्षण बनला आहे. पण या किल्ल्यातील सुरक्षा पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे.या किल्याची दुरुस्ती आणि देखभाल सोलापूरच्या युनिटी मल्टीकॉन कंपनीला देण्यात आली होती. कंपनीने लाखो रुपये पर्यटकांकडून वसूल केले. आता मुदत संपली असताना देखील पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना धरून वसुली सुरु आहे. मुदत संपूनही युनिटी मल्टीकॉन कंपनीने किल्ला न सोडल्याने या दुर्घनेला जबाबदार कोण ? असा प्रश्न विचारला जात आहे.

अशी घडली दुर्घटना

धोकादायक ठिकाणी उभा राहून सेल्फी काढण्याचा मोह अनेकांना सुटत नाही. मात्र अशा सेल्फीमुळे आपण आपला जीव धोक्यात घालत आहोत याची कल्पना फोटो काढताना येत नाही. अनेकदा धोकादायक ठिकाणी सेल्फी काढताना खाली पडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. आता नळदुर्ग किल्ल्यात उपल्या बुरुजावर उभा राहून सेल्फी काढताना तोल गेल्यानं एका नवविवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. अवघ्याचार दिवसांपूर्वी लग्न झालेल्या तरुणीच्या मृत्यूने मोठी खळबळ उडाली आहे.

तुळजापूर तालुक्यातली हँगरगा (तूळ ) गावची तरुणी आपल्या नवऱ्यासोबत नळदुर्ग किल्ल्यावर फिरायला आली होती. दहा दिवसांपूर्वीच तिचं लग्न झालं होतं. लग्नानंतर फिरायला ती किल्ल्यावर आली होती. तेव्हा नळदुर्ग किल्ल्यातल्या उपल्या बुरुजावर ती सेल्फी घेत होती. तेव्हा तोल जाऊन ती खाली पडली.

तरुणी बुरुजावरून खाली पडल्यानं गंभीर जखमी झाली होती. तिला उपचारासाठी नळदुर्ग उपजिल्हा रुग्णालयात दाखल कऱण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. निलोफर अमीर शेख असं २२ वर्षीय तरुणीचं नाव आहे.

ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्यातील उपल्या बुरुजास एकूण ७७ पायऱ्या आहेत. हा बुरुज पर्यटकांचे आकर्षण आहे पण या बुरुजाला कसलीही सुरक्षा नाही. त्यामुळेच सेल्फीच्या नादात एका नवविवाहित तरुणीची हकनाक बळी गेला आहे.

Previous Post

दिंडेगाव आणि ढोकी येथे हाणामारी

Next Post

उपविभागीय अधिकारी डॉ. योगेश खरमाटे यांच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

उपविभागीय अधिकारी डॉ. योगेश खरमाटे यांच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

पाटी बदलली, पण नशीब कधी बदलणार? ‘धाराशिव’च्या विकासाची गाडी खड्ड्यातच!

पाटी बदलली, पण नशीब कधी बदलणार? ‘धाराशिव’च्या विकासाची गाडी खड्ड्यातच!

April 21, 2026
पवनराजे निंबाळकर हत्याकांड: युक्तिवाद संपला, आता निकालाची प्रतीक्षा; २४ मार्चला तारीख ठरणार

कै. पवनराजे निंबाळकर हत्याकांड: तब्बल २० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर १४ मे रोजी लागणार निकाल; संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष!

April 20, 2026
महावितरणच्या कारभाराविरोधात ठाकरे गटाचा संताप; धाराशिवमध्ये तीव्र ‘रास्ता रोको’

महावितरणच्या कारभाराविरोधात ठाकरे गटाचा संताप; धाराशिवमध्ये तीव्र ‘रास्ता रोको’

April 20, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

कपडे खरेदीचा बहाणा करून दुकानातून १ लाख ९० हजारांची रोकड पळवली

April 20, 2026
अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

महाळंगीत किरकोळ वादातून तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला; तिघांवर गुन्हा दाखल

April 20, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group