धाराशिव – लोकसभेच्या धाराशिव मतदारसंघात शिवसेना ( उबाठा ) चे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आघाडीवर आहेत. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार राष्ट्रवादी ( अजित पवार गट ) चे सौ. अर्चनाताई पाटील यांच्यापेक्षा 224459 मताची आघाडी घेतली आहे . ओमराजे यांनी मोठी लीड घेतल्याने त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.
लोकसभेच्या धाराशिव मतदारसंघात ७ मे रोजी निवडणूक पार पडली होती. एकूण मतदान सरासरी 63.88 टक्के झाले होते. 19 लक्ष 92 हजार 737 मतदारांपैकी 12 लक्ष 72 हजार 969 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता . यामध्ये 6 लक्ष 90 हजार 533 पुरुष, 5 लक्ष 82 हजार 416 स्त्री आणि 20 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. .या मतदारसंघात एकूण 31 उमेदवार रिंगणात उतरले होते. पण विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर आणि सौ. अर्चनाताई पाटील या दीर – भावजयमध्ये खरा सामना आहे.