धाराशिव – लोकसभेच्या धाराशिव मतदारसंघातून शिवसेना ( उबाठा ) चे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर हे दणदणीत मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी सौ. अर्चनाताई पाटील यांचा जवळपास 3 लाख मतांनी पराभव केला आहे.
लोकसभेच्या धाराशिव मतदारसंघात ७ मे रोजी निवडणूक पार पडली होती. एकूण मतदान सरासरी 63.88 टक्के झाले होते. 19 लक्ष 92 हजार 737 मतदारांपैकी 12 लक्ष 72 हजार 969 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता . यामध्ये 6 लक्ष 90 हजार 533 पुरुष, 5 लक्ष 82 हजार 416 स्त्री आणि 20 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. .या मतदारसंघात एकूण 31 उमेदवार रिंगणात उतरले होते. पण विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर आणि सौ. अर्चनाताई पाटील या दीर – भावजयमध्ये खरा सामना झाला.
मतमोजणीच्या 24 व्या फेरीअखेर ओमराजे निंबाळकर यांना 7 लाख 40 हजार तर सौ. अर्चनाताई पाटील यांना 4 लाख 15 हजार मते पडली होती. ओमराजे निंबाळकर हे पहिल्या फेरीपासून आघाडीवर होते. त्यांनी ही आघाडी शेवटच्या फेरीपर्यंत कायम ठेवली होती.
ओमराजे निंबाळकर यांच्या विजयाची कारणे
– मोठा- जनसंपर्क , सोशल मीडियावर आघाडी
– मुस्लिम मतदार 100 पैकी 90 टक्के बाजूला
– मराठा मतदार 100 पैकी 80 टक्के बाजूला
सौ. अर्चनाताई पाटील यांच्या पराभवाची कारणे
– आमदार पती राणा जगजितसिंह पाटील भाजप आणि स्वतः राष्ट्रवादी यामुळे महायुतीला मानणारा वर्ग नाराज
– घराणेशाहीचा आरोप
– मनोज जरांगे पाटील यांच्या बद्दल आ. राणा जगजितसिंह पाटील यांनी वादग्रस्त विधान केल्याने मराठा मतदारांचा फटका