धाराशिव – लोकसभेच्या धाराशिव मतदारसंघातून शिवसेना ( उबाठा ) चे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर हे दणदणीत मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी सौ. अर्चनाताई पाटील यांचा जवळपास 3 लाख २९ हजार मतांनी पराभव केला आहे.महायुतीकडे सर्व नेते एकत्र येऊनही जनतेने त्यांना धूळ चारली आहे.
ओमराजे निंबाळकर यांना एकूण 7 लाख ४८ हजार तर सौ. अर्चनाताई पाटील यांना 4 लाख १८ हजार मते पडली आहेत.. ओमराजे निंबाळकर हे पहिल्या फेरीपासून आघाडीवर होते. त्यांनी ही आघाडी शेवटच्या फेरीपर्यंत कायम ठेवली होती. अर्चना पाटील वगळता अन्य २९ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले.
लोकसभेच्या धाराशिव मतदारसंघात ७ मे रोजी निवडणूक पार पडली होती. एकूण मतदान सरासरी 63.88 टक्के झाले होते. 19 लक्ष 92 हजार 737 मतदारांपैकी 12 लक्ष 72 हजार 969 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता . यामध्ये 6 लक्ष 90 हजार 533 पुरुष, 5 लक्ष 82 हजार 416 स्त्री आणि 20 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. .या मतदारसंघात एकूण 31 उमेदवार रिंगणात उतरले होते. पण विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर आणि सौ. अर्चनाताई पाटील या दीर – भावजयमध्ये खरा सामना झाला.
ओमराजे निंबाळकर यांच्या विजयाची कारणे
– मोठा- जनसंपर्क , सोशल मीडियावर आघाडी
– मुस्लिम मतदार 100 पैकी 90 टक्के बाजूला
– मराठा मतदार 100 पैकी 80 टक्के बाजूला
सौ. अर्चनाताई पाटील यांच्या पराभवाची कारणे
– आमदार पती राणा जगजितसिंह पाटील भाजप आणि स्वतः राष्ट्रवादी यामुळे महायुतीला मानणारा वर्ग नाराज
– घराणेशाहीचा आरोप
– मनोज जरांगे पाटील यांच्या बद्दल आ. राणा जगजितसिंह पाटील यांनी वादग्रस्त विधान केल्याने मराठा मतदारांचा फटका
कोणत्या उमेदवाराला किती मते वाचा