• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, September 18, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

परंडा पोलिसांची धडक कारवाई; कत्तलीसाठी चालवलेल्या १४ गायींची सुटका, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

admin by admin
April 29, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

परंडा : कत्तलीच्या उद्देशाने चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता अत्यंत क्रूरपणे १४ जर्सी गायींची बेकायदेशीर वाहतूक करणारा आयशर ट्रक परंडा पोलिसांनी पकडला. वांगी बु. (ता. परंडा) नजीकच्या पेट्रोल पंपाजवळ ही कारवाई करण्यात आली असून, पोलिसांनी जनावरे आणि वाहनासह तब्बल ११ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साजीद अब्दुल रहीम कासार (वय ३६, रा. वाढवना बु., ता. उदगीर, जि. लातूर) आणि आरुआत फारुक कुरेशी (रा. अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता. २८) मध्यरात्री सव्वा बारा वाजण्याच्या (००.१५ वा.) सुमारास वारदवाडी ते भूम जाणाऱ्या रस्त्यावरील वांगी बु. येथील नायरा पेट्रोल पंपाजवळ पोलिसांनी संशयावरून एक आयशर ट्रक (MH 25 B 9190) अडवला. या वाहनाची तपासणी केली असता, त्यात १४ जर्सी जातीच्या गायी अत्यंत दाटीवाटीने व क्रूरपणे भरलेल्या अवस्थेत आढळून आल्या. या जनावरांसाठी चारा-पाण्याची कोणतीही सोय केलेली नव्हती आणि त्यांची कत्तलीसाठी निर्दयीपणे वाहतूक केली जात असल्याचे उघडकीस आले.

या कारवाईत पोलिसांनी ४ लाख २० हजार रुपये किमतीच्या १४ जर्सी गायी आणि वाहन असा एकूण ११ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी परंडा पोलिसांनी सरकारच्या वतीने फिर्याद दिली असून, आरोपींविरुद्ध प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियमाचे कलम ११(१)(ए), ११(१)(एफ), ११(१)(एच), ११(१)(आय) सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमाचे कलम ५(अ), ५(बी), ९(ब), ११ आणि परिवहन नियम ४७, ५४, ५६ अन्वये परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Previous Post

तुळजापूर-लातूर रस्त्यावर लुटमार; तरुणाला मारहाण करून सोन्याच्या अंगठीसह रोकड पळवली

Next Post

कोकणातील हापूसप्रमाणे धाराशिवच्या केशर आंबा उत्पादकांनाही नुकसान भरपाई द्या!

Next Post
धाराशिव जिल्ह्यात रब्बी हंगामातील ई-पीक पाहणी केवळ २१ टक्के

कोकणातील हापूसप्रमाणे धाराशिवच्या केशर आंबा उत्पादकांनाही नुकसान भरपाई द्या!

ताज्या बातम्या

पोलिसांची ८ महिने टोलवाटोलव, आगार प्रमुखाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न; एसटी चालकाच्या आत्मदहनाच्या इशाऱ्यानंतर अखेर FIR

पोलिसांची ८ महिने टोलवाटोलव, आगार प्रमुखाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न; एसटी चालकाच्या आत्मदहनाच्या इशाऱ्यानंतर अखेर FIR

September 18, 2026
एसटी बसमध्ये बनावट दिव्यांग कार्ड वापरून फसवणूक; आगार प्रमुखासह प्रवाशाविरुद्ध तुळजापूर पोलिसांत गुन्हा दाखल

एसटी बसमध्ये बनावट दिव्यांग कार्ड वापरून फसवणूक; आगार प्रमुखासह प्रवाशाविरुद्ध तुळजापूर पोलिसांत गुन्हा दाखल

September 18, 2026
‘मराठवाड्याची शिवकाशी’ तेरखेड्यातील फटाका उद्योग संशयाच्या भोवऱ्यात!

‘मराठवाड्याची शिवकाशी’ तेरखेड्यातील फटाका उद्योग संशयाच्या भोवऱ्यात!

September 17, 2026
‘झेंडा मंत्री’ प्रताप सरनाईकांचा ‘व्हिडिओ कॉल’ दुष्काळ दौरा: उंटावरून शेळ्या हाकण्याचा नवा विक्रम!

‘झेंडा मंत्री’ प्रताप सरनाईकांचा ‘व्हिडिओ कॉल’ दुष्काळ दौरा: उंटावरून शेळ्या हाकण्याचा नवा विक्रम!

September 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उमरगा : सामाजिक वनीकरण कार्यालयात घुसून वनरक्षकाच्या अंगावर ओतली काळी शाई; शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

September 17, 2026

Recent Posts

  • पोलिसांची ८ महिने टोलवाटोलव, आगार प्रमुखाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न; एसटी चालकाच्या आत्मदहनाच्या इशाऱ्यानंतर अखेर FIR
  • एसटी बसमध्ये बनावट दिव्यांग कार्ड वापरून फसवणूक; आगार प्रमुखासह प्रवाशाविरुद्ध तुळजापूर पोलिसांत गुन्हा दाखल
  • ‘मराठवाड्याची शिवकाशी’ तेरखेड्यातील फटाका उद्योग संशयाच्या भोवऱ्यात!
  • ‘झेंडा मंत्री’ प्रताप सरनाईकांचा ‘व्हिडिओ कॉल’ दुष्काळ दौरा: उंटावरून शेळ्या हाकण्याचा नवा विक्रम!
  • उमरगा : सामाजिक वनीकरण कार्यालयात घुसून वनरक्षकाच्या अंगावर ओतली काळी शाई; शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!