• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, September 18, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तुळजापूर-लातूर रस्त्यावर लुटमार; तरुणाला मारहाण करून सोन्याच्या अंगठीसह रोकड पळवली

admin by admin
April 29, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

बेंबळी : तुळजापूर-लातूर महामार्गावरील आरणी पाटीजवळ एका तरुणाला व त्याच्या मित्राला रस्त्यात अडवून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बळजबरीने दोन तोळ्यांची सोन्याची अंगठी आणि रोख रक्कम हिसकावून घेतल्याप्रकरणी तीन जणांवर बेंबळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आदित्य शाम शिंदे (वय २३, रा. एल.आय.सी. कॉलनी, लातूर) असे लुटण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आदित्य शिंदे हे आपल्या एका मित्रासोबत तुळजापूरहून लातूरच्या दिशेने जात होते. दरम्यान, ते आरणी पाटीजवळ आले असता आरोपींनी त्यांना वाटेत अडवले. यानंतर आरोपींनी आदित्य व त्यांच्या मित्राला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. याच झटापटीत आरोपींनी जबरदस्तीने आदित्य यांच्या हातातील दोन तोळ्यांची सोन्याची अंगठी आणि खिशातील १,००० रुपयांची रोकड हिसकावून घेतली व तेथून पोबारा केला.

याप्रकरणी आदित्य शिंदे यांनी मंगळवारी (ता. २८) बेंबळी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यांच्या प्रथम खबरीवरून आरोपी तौशीफ बशीर बागवान, चेतन गजेंद्र आदटराव आणि अतिश बाळू लोहार (सर्व रा. करजखेडा, ता. जि. धाराशिव) या तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३०९(४), ११५(२), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. बेंबळी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

घरात वृद्ध महिला झोपेत असताना चोरी; रोकड व दागिन्यांसह ७७ हजारांचा ऐवज लंपास

ढोकी : घरात एकटीच महिला झोपली असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने कपाटातील रोख रक्कम व सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह एकूण ७७ हजार रुपयांचा ऐवज लांबवल्याची घटना धाराशिव तालुक्यातील गोपाळवाडी येथे घडली आहे. याप्रकरणी ढोकी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, गोपाळवाडी (ता. जि. धाराशिव) येथील फिर्यादी हनुमंत धोंडीराम मोटे (वय ५३) यांची आई घरात एकटीच होती. त्या घराचा दरवाजा केवळ पुढे ओढून (लोटून) झोपल्या होत्या. याच परिस्थितीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. यानंतर चोरट्याने घरातील कपाटात उचकापाचक करून त्यातील ८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने आणि ३० हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण ७७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला.

सकाळी चोरीचा हा प्रकार लक्षात आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. यानंतर फिर्यादी हनुमंत मोटे यांनी मंगळवारी (ता. २८) ढोकी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या प्रथम खबरीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३०५ (अ) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास ढोकी पोलीस करत आहेत.

Previous Post

धाराशिव नगरपालिकेत ‘बिग बॉस’चा ड्रामा! ‘लेडी सिंघम’चा डोस, ‘तुतारी-कमळा’चा राडा आणि ‘त्या’ नेत्याचे ‘उपनगराध्यक्ष’ पदाचे डोहाळे!

Next Post

परंडा पोलिसांची धडक कारवाई; कत्तलीसाठी चालवलेल्या १४ गायींची सुटका, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

Next Post
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

परंडा पोलिसांची धडक कारवाई; कत्तलीसाठी चालवलेल्या १४ गायींची सुटका, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

ताज्या बातम्या

पोलिसांची ८ महिने टोलवाटोलव, आगार प्रमुखाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न; एसटी चालकाच्या आत्मदहनाच्या इशाऱ्यानंतर अखेर FIR

पोलिसांची ८ महिने टोलवाटोलव, आगार प्रमुखाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न; एसटी चालकाच्या आत्मदहनाच्या इशाऱ्यानंतर अखेर FIR

September 18, 2026
एसटी बसमध्ये बनावट दिव्यांग कार्ड वापरून फसवणूक; आगार प्रमुखासह प्रवाशाविरुद्ध तुळजापूर पोलिसांत गुन्हा दाखल

एसटी बसमध्ये बनावट दिव्यांग कार्ड वापरून फसवणूक; आगार प्रमुखासह प्रवाशाविरुद्ध तुळजापूर पोलिसांत गुन्हा दाखल

September 18, 2026
‘मराठवाड्याची शिवकाशी’ तेरखेड्यातील फटाका उद्योग संशयाच्या भोवऱ्यात!

‘मराठवाड्याची शिवकाशी’ तेरखेड्यातील फटाका उद्योग संशयाच्या भोवऱ्यात!

September 17, 2026
‘झेंडा मंत्री’ प्रताप सरनाईकांचा ‘व्हिडिओ कॉल’ दुष्काळ दौरा: उंटावरून शेळ्या हाकण्याचा नवा विक्रम!

‘झेंडा मंत्री’ प्रताप सरनाईकांचा ‘व्हिडिओ कॉल’ दुष्काळ दौरा: उंटावरून शेळ्या हाकण्याचा नवा विक्रम!

September 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उमरगा : सामाजिक वनीकरण कार्यालयात घुसून वनरक्षकाच्या अंगावर ओतली काळी शाई; शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

September 17, 2026

Recent Posts

  • पोलिसांची ८ महिने टोलवाटोलव, आगार प्रमुखाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न; एसटी चालकाच्या आत्मदहनाच्या इशाऱ्यानंतर अखेर FIR
  • एसटी बसमध्ये बनावट दिव्यांग कार्ड वापरून फसवणूक; आगार प्रमुखासह प्रवाशाविरुद्ध तुळजापूर पोलिसांत गुन्हा दाखल
  • ‘मराठवाड्याची शिवकाशी’ तेरखेड्यातील फटाका उद्योग संशयाच्या भोवऱ्यात!
  • ‘झेंडा मंत्री’ प्रताप सरनाईकांचा ‘व्हिडिओ कॉल’ दुष्काळ दौरा: उंटावरून शेळ्या हाकण्याचा नवा विक्रम!
  • उमरगा : सामाजिक वनीकरण कार्यालयात घुसून वनरक्षकाच्या अंगावर ओतली काळी शाई; शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!