• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, July 29, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव नगरपालिकेत ‘बिग बॉस’चा ड्रामा! ‘लेडी सिंघम’चा डोस, ‘तुतारी-कमळा’चा राडा आणि ‘त्या’ नेत्याचे ‘उपनगराध्यक्ष’ पदाचे डोहाळे!

admin by admin
April 29, 2026
in राजकारण
Reading Time: 1 min read
धाराशिव नगरपालिकेत ‘बिग बॉस’चा ड्रामा! ‘लेडी सिंघम’चा डोस, ‘तुतारी-कमळा’चा राडा आणि ‘त्या’ नेत्याचे ‘उपनगराध्यक्ष’ पदाचे डोहाळे!
0
SHARES
1.2k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव नगरपालिकेची सर्वसाधारण सभा म्हणजे हल्ली नेटफ्लिक्सवरच्या एखाद्या राजकीय थ्रिलर वेबसिरीजलाही लाजवेल असा ‘एंटरटेनमेंट डोस’ झाला आहे. एरवी “नगरसेवक साहेब आले, साहेब बसले” असा थाटमाट असतो, पण मंगळवारच्या सभेत मात्र स्क्रिप्ट पूर्णपणे उलटी फिरली. अधिकारी नगरसेवकांना घाबरण्याऐवजी, अधिकाऱ्यांनीच सत्ताधाऱ्यांची ‘शाळा’ घेतली आणि पडद्यामागच्या एका ‘महत्वाकांक्षी’ नेत्याने स्वतःच्याच पक्षाची ‘सुपारी’ घेऊन सभागृहात ‘बिग बॉस’चा खेळ रंगवला!

अंक १: ‘लेडी सिंघम’ची एन्ट्री आणि सत्ताधाऱ्यांची भंबेरी!

नगरपालिकेचे कारभारी म्हणजे शहराचे राजेच, असा अनेकांचा समज असतो. पण मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी थेट ‘लेडी सिंघम’चा अवतार धारण करत सत्ताधारी नगरसेवकांना असा काही सज्जड दम भरला की सभागृहात ‘सन्नाटा’ पसरला. “कर्मचाऱ्यांवर दबाव आणून नियमबाह्य कामे कराल, तर थेट गुन्हे दाखल करेन,” हा मुख्याधिकाऱ्यांचा डायलॉग ऐकून अनेक ‘माननीय’ नगरसेवकांना घामच फुटला असेल. एरवी फाईलींवर वजन ठेवून कामे करून घेण्याच्या सवयीला आता ‘एफआयआर’चा ब्रेक लागणार म्हटल्यावर, शहरात “खरंच आपले साहेब नियमबाह्य कामे करतात की काय?” अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे. इतिहासात पहिल्यांदाच ‘बॉस कोण?’ हे प्रशासनाने दाखवून दिले आहे.

अंक २: ‘प्रोसिडिंग’वरून शिवसेनेची ‘कट्टी’

सभेच्या सुरुवातीलाच ठाकरे गटाच्या शिवसेनेने “आमचा स्कोअर बोर्डवर लिहिला नाही, तर आम्ही खेळणारच नाही” अशी भूमिका घेत वॉकआउट केला. मागील सभेचे इतिवृत्त (प्रोसिडिंग) पोर्टलवर नसल्याने शिवसेना आणि विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी निषेधाचे फलक भिरकावत थेट ‘सभात्याग’ केला. त्यामुळे मैदानात राहिले ते फक्त सत्ताधारी भाजप, त्यांना पडद्यामागून साथ देणारे राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) नगरसेवक आणि एमआयएमचा एक ‘भिडू’.

अंक ३: ‘तुतारी आणि कमळ’ची जुगलबंदी… की फिक्सिंग?

सभागृहात विरोधक नाहीत, मग भांडायचं कुणाशी? यावर भन्नाट उपाय काढत ‘छुप्या युती’तले मित्रच एकमेकांवर धावून गेले! “तुतारी और कमल एकीच है” या व्हायरल डायलॉगची अक्षरशः वाट लावत, भाजप आणि शरद पवार गटाचे नगरसेवक ‘गणेशनगरच्या पाईपलाईन’वरून एकमेकांना भिडले. गंमत म्हणजे, हा विषय सभेच्या अजेंड्यावरच नव्हता! ना कुणी सूचक, ना अनुमोदक, तरीही “आम्ही भांडणार म्हणजे भांडणारच” या जिद्दीने हा ‘आऊट ऑफ सिलॅबस’ राडा घातला गेला. या गोंधळात अध्यक्षा आणि सचिवांसाठी चक्क अर्वाच्य भाषेचा वापर झाला. नगराध्यक्षांनीही “पुन्हा असं कराल तर कारवाईचा बडगा उगारू” असा दम भरला.

अंक ४: ‘इनसाईड स्टोरी’… राड्याचा ‘डायरेक्टर’ कोण?

हा सगळा राडा ‘ऑर्गेनिक’ नव्हता भाऊ, तर ‘स्पॉन्सर्ड’ होता! या संपूर्ण तमाशाचे खरे रहस्य सत्ताधारी भाजपच्याच एका ‘महत्वाकांक्षी’ नेत्याच्या राजकीय ‘डोहाळ्यांमध्ये’ लपले आहे.

या नेत्याला सध्या ‘उपनगराध्यक्ष’ पदाचे तीव्र डोहाळे लागले आहेत. अलिखित ठरवानुसार दर सहा महिन्यांनी उपाध्यक्ष बदलायचा असतो. या नेत्याचा ‘मास्टरप्लॅन’ असा आहे की, आधी उपनगराध्यक्ष व्हायचे, मग सध्याच्या नगराध्यक्षा मॅडमला ‘सक्तीच्या रजेवर’ पाठवायचे आणि आपणच ‘प्रभारी अध्यक्ष’ म्हणून खुर्ची उबवायची!

पण त्यासाठी स्वतःची ‘किंमत’ दाखवणे गरजेचे होते. म्हणून याच नेत्याने शरद पवार गटाच्या नगरसेवकांना “जरा सभेत गोंधळ घाला” अशी ‘सुपारी’ दिल्याची जोरदार चर्चा आहे. उद्देश हाच की, “बघा, सभागृहात किती गोंधळ होतोय, हे विरोधक कुणालाच जुमानत नाहीत. पण जर ‘मी’ उपनगराध्यक्ष असेल, तर विरोधकांना कसं खिशात ठेवून कामकाज सुरळीत चालवतो बघा!” म्हणजे स्वतःच आग लावायची आणि स्वतःच फायर ब्रिगेडचा बंब घेऊन हिरोसारखी एन्ट्री मारायची!

क्लायमॅक्स: पत्रकाराची ‘एक्स्क्लुझिव्ह’ एन्ट्री

या ‘डायरेक्टर’ महाशयांनी आपल्या प्लॅनमध्ये कोणतीही कसर सोडली नाही. एरवी सर्वसाधारण सभेत पत्रकारांना नो-एन्ट्री असते. पण “आपला हा राडा आणि विरोधकांचा तमाशा जनतेपर्यंत पोहोचलाच पाहिजे” या उदात्त हेतूने, याच नेत्याने एका पत्रकाराला गुपचूप सभागृहात बोलावले. त्याच्याकडून या सगळ्या ‘स्क्रिप्टेड’ तमाशाचे व्हिडिओ शूटिंग करवून घेतले आणि ते प्रसारमाध्यमांना ‘लीक’ करण्याचे महान कार्यही पार पाडले.

तात्पर्य:

या ऐतिहासिक सभेत अभय योजनेला मुदतवाढ देणे आणि वाहनतळाच्या जागेवर ‘व्यापारी संकुल’ (हे तर होणारच होतं!) उभारण्याचा निर्णय झाला. पण या सगळ्यात सर्वात ‘परफेक्ट’ निर्णय कोणता असेल, तर तो म्हणजे पाणीपुरवठा विभागासाठी ‘तुरटी’ खरेदी करण्याचा!

खरं तर, धाराशिवच्या या अत्यंत गढूळ झालेल्या राजकारणात आणि ‘खुर्चीसाठी’ सुरू असलेल्या या साठमारीत, आता एका मोठ्या ‘तुरटीची’च गरज आहे. जेणेकरून हा राजकारणाचा गाळ खाली बसेल आणि धाराशिवकरांना थोडे तरी ‘स्वच्छ’ पाणी आणि प्रशासन पाहायला मिळेल! तोपर्यंत जनतेने पॉपकॉर्न घेऊन या राजकीय ‘पाईपलाईन’च्या ड्रामाचा आनंद घ्यावा, हेच उत्तम!

Previous Post

येडेश्वरी मंदिर परिसरात पुन्हा ‘टायगर गेम’चा सुळसुळाट; इन्स्टाग्राम रीलमुळे पोलिसांचा दावा फोल

Next Post

तुळजापूर-लातूर रस्त्यावर लुटमार; तरुणाला मारहाण करून सोन्याच्या अंगठीसह रोकड पळवली

Next Post
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूर-लातूर रस्त्यावर लुटमार; तरुणाला मारहाण करून सोन्याच्या अंगठीसह रोकड पळवली

ताज्या बातम्या

धाराशिव भाजप भवनावरून कायदेतज्ज्ञांत रंगला ‘कलगीतुरा’!

धाराशिव भाजप भवनावरून कायदेतज्ज्ञांत रंगला ‘कलगीतुरा’!

July 29, 2026
धाराशिवमध्ये भाजपची नवी टीम: तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी, संघटनात्मक बांधणीवर भर

‘कार्यारंभ आदेश’ अन् मालकीणीचा दम! धाराशिव भाजपचा भाड्याचा संसार अन् निष्ठावंतांचा ‘सहनशील’ स्वाभिमान!

July 29, 2026
‘धाराशिव लाईव्ह’च्या बातमीचा दणका! भाजप भवनाच्या बांधकामाला लवकरच सुरुवात होणार

‘धाराशिव लाईव्ह’च्या बातमीचा दणका! भाजप भवनाच्या बांधकामाला लवकरच सुरुवात होणार

July 29, 2026
धाराशिवमध्ये भाजपची नवी टीम: तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी, संघटनात्मक बांधणीवर भर

देशात सत्ता, राज्यात सत्ता… मग धाराशिवच्या भाजप भवनाला कोणाचं ग्रहण?

July 29, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र सुरुच; ६ लाखांहून अधिक मुद्देमालाची लांबवालांबव, ५ पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल

July 29, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!