• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, September 10, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

येडेश्वरी मंदिर परिसरात पुन्हा ‘टायगर गेम’चा सुळसुळाट; इन्स्टाग्राम रीलमुळे पोलिसांचा दावा फोल

ग्रामस्थ आणि भाविकांमध्ये संताप; देवस्थान ट्रस्ट आणि पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

admin by admin
April 28, 2026
in धाराशिव जिल्हा
Reading Time: 1 min read
येडेश्वरी मंदिर परिसरात पुन्हा ‘टायगर गेम’चा सुळसुळाट; इन्स्टाग्राम रीलमुळे पोलिसांचा दावा फोल
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

येरमाळा : राज्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या येथील श्री येडेश्वरी देवी मंदिर परिसरात पुन्हा एकदा ‘टायगर गेम’ या बेकायदेशीर जुगाराने डोके वर काढले आहे. मंदिर परिसरातच राजरोसपणे जुगाराचे अड्डे सुरू झाल्यामुळे देवस्थानच्या पावित्र्याला गालबोट लागत असून, भाविक व ग्रामस्थांमधून प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

गेल्या वर्षी याच मंदिर परिसरात जुगारावरून पुणे येथील काही महिला भाविक आणि जुगाऱ्यांमध्ये जोरदार वाद आणि झटापट झाली होती. या घटनेचा व्हिडिओ राज्यभर व्हायरल झाल्याने देवस्थानची मोठी बदनामी झाली होती. या गंभीर प्रकारानंतर येरमाळा पत्रकार संघाने थेट राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन हा प्रकार तात्काळ थांबवण्याची मागणी केली होती. मात्र, देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत प्रशासन आणि पोलिसांनी हा प्रकार कायमस्वरूपी थांबवण्यासाठी कोणतीही ठोस कागदोपत्री कारवाई केली नाही. परिणामी, नुकत्याच पार पडलेल्या पौर्णिमा यात्रेनंतर या भागात जुगाराचे टेबल पुन्हा थाटल्याचे दिसून येत आहे.

पोलिसांच्या कार्यपद्धतीवर संशय

गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि पत्रकारांनी वारंवार पोलिसांकडे तक्रारी केल्या आहेत. विशेष म्हणजे, जुगाराचे टेबल सुरू असल्याचे फोटो पोलिसांना पाठवले, की पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत तेथून टेबल हटवले जातात. त्यानंतर पोलिसांकडून ‘आम्ही गेलो होतो, तिथे कोणीही आढळून आले नाही’ असे ठरलेले उत्तर दिले जाते, असा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणा, देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत यांचे जुगाऱ्यांशी हितसंबंध आहेत का? असा गंभीर सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.

इन्स्टाग्राम रीलने उघड केली पोलखोल

पोलिसांच्या ‘आळीमिळी गुपचिळी’ भूमिकेचा भांडाफोड मंगळवारी एका भाविकाच्या इन्स्टाग्राम रीलमुळे झाला आहे. या भाविकाने तयार केलेल्या आणि सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असलेल्या रीलमध्ये, मंदिर परिसरात टायगर गेमचे टेबल उघडपणे सुरू असल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी आता थेट पोलिसांनाच कोंडीत पकडले असून, “हा बघा टेबलाचा पुरावा, आता तरी कारवाई करणार का?” असा थेट जाब विचारण्यास सुरुवात केली आहे.

भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

जुगाराच्या या वाढत्या प्रकारांमुळे मंदिर परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या सामान्य भाविकांच्या आणि विशेषतः महिलांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधित जुगार तात्काळ बंद करावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थ, भाविक आणि पत्रकारांकडून केली जात आहे.

Previous Post

‘कर्मचाऱ्यांवर दबाव आणाल, तर थेट गुन्हे दाखल करू’ – मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी सत्ताधाऱ्यांना सुनावले खडे बोल

Next Post

धाराशिव नगरपालिकेत ‘बिग बॉस’चा ड्रामा! ‘लेडी सिंघम’चा डोस, ‘तुतारी-कमळा’चा राडा आणि ‘त्या’ नेत्याचे ‘उपनगराध्यक्ष’ पदाचे डोहाळे!

Next Post
धाराशिव नगरपालिकेत ‘बिग बॉस’चा ड्रामा! ‘लेडी सिंघम’चा डोस, ‘तुतारी-कमळा’चा राडा आणि ‘त्या’ नेत्याचे ‘उपनगराध्यक्ष’ पदाचे डोहाळे!

धाराशिव नगरपालिकेत 'बिग बॉस'चा ड्रामा! 'लेडी सिंघम'चा डोस, 'तुतारी-कमळा'चा राडा आणि 'त्या' नेत्याचे 'उपनगराध्यक्ष' पदाचे डोहाळे!

ताज्या बातम्या

पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंड्यातील तरुणाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या

पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंड्यातील तरुणाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या

September 9, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

शेळका धानोरा : घर बंद असल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी कपाट फोडले; २२ ग्रॅम सोन्यासह ९८ हजारांचा मुद्देमाल लंपास

September 9, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

भोत्रा : सीना नदीच्या पात्रात जुन्या वादातून इसमाला रॉड अन् काठीने बेदम मारहाण

September 9, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

अणदूरमध्ये जनावरे चारण्यावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी; दगड, लोखंडी रॉड अन् कुऱ्हाडीने हल्ला

September 9, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

नळदुर्ग : १३ वर्षीय अल्पवयीन बालिकेवर वारंवार लैंगिक अत्याचार; लग्नासाठी बेल्टने मारहाण करत धमकी

September 8, 2026

Recent Posts

  • पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंड्यातील तरुणाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या
  • शेळका धानोरा : घर बंद असल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी कपाट फोडले; २२ ग्रॅम सोन्यासह ९८ हजारांचा मुद्देमाल लंपास
  • भोत्रा : सीना नदीच्या पात्रात जुन्या वादातून इसमाला रॉड अन् काठीने बेदम मारहाण
  • अणदूरमध्ये जनावरे चारण्यावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी; दगड, लोखंडी रॉड अन् कुऱ्हाडीने हल्ला
  • नळदुर्ग : १३ वर्षीय अल्पवयीन बालिकेवर वारंवार लैंगिक अत्याचार; लग्नासाठी बेल्टने मारहाण करत धमकी
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!