मुरुम : आरोपी नामे-विशाल अंबादास चौधरी, पंढरीनाथ दिलीप पाटील, विश्वजीत अंबादास चौधरी,लक्ष्मण गायकवाड, अजय औताडे, नागेश महादेव जेवळे सर्व रा. आष्टाकासार ता. लोहारा जि. धाराशिव यांनी दि. 16.06.2024 रोजी 19.00 वा. सु. मोतीराम हरीबा राठोड यांचे हॉटेल समोर आष्टाकासार येथे फिर्यादी नामे-मंथन शांताप्पा बिराजदार, वय 27 वर्षे, रा. तुगाव ता. उमरगा जि. धाराशिव ट्रॅक्टर लावण्याचे कारणावरुन नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, खुर्चीने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- मंथन बिराजदार दि.17.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 143, 147, 149, 324, 323, 504, 506 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
परंडा : आरोपी नामे-संतोष नामदेव घोगरे, रा. जवळा नि. ता. परंडा जि. धाराशिव, रमाभाउ विश्वनाथ भोरे, दादा रामभाउ भोरे, दोघे रा टाकळी ता. परंडा जि. धाराशिव यांनी दि. 16.06.2024 रोजी 23.00 वा. सु. टाकळी शेत गट नं 117 मध्ये फिर्यादी नामे-राधिका शंकर भोरे, वय 45 वर्षे, टाकळी ता.परंडा जि. धाराशिव यांना व जाउ जयश्री गणपती भोरे यांना नमुद आरोपींनी शेतीच्या वादाच्या कारणावरुन नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, बेल्टने व दाव्याने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- राधिका भोरे दि.17.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 143, 147, 148, 149, 324, 323, 504, 506 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
परंडा : आरोपी नामे-, राधिका शंकर भोरे, जयश्री गणपती भोरे, ब्रम्हदेव भाउराव भोरे, सुर्यकांत भाउराव भोरे, तुषार दत्तात्रय गोडसे, दत्तात्रय सुखदेव गाडेसे, सर्व रा. टाकळी ता. परंडा जि. धाराशिव यांनी दि. 16.06.2024 रोजी 22.30 वा. सु. टाकळी शेत गट नं 117 मध्ये फिर्यादी नामे- संतोष नामदेव घोगरे, वय 33 वर्षे, रा. जवळा नि. ता. परंडा जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी जमीन पेरणीच्या कारणावरुन नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-संतोष घोगरे दि.17.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 143, 147, 149, 323, 504, 506 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
फसवणूक
नळदुर्ग : आरोपी नामे-किरणकुमार कृष्णाकुमार कृष्णहरी सुलेगाव रा. सोलापूर ता. जि. सोलापूर यांनी दि. 07.06.2024 रोजी 06.00 वा. सु. दि. 09.06.2024 रोजी 06.00 वा. सु. परममंगल पेट्रोलियम केरुर येथे नमुद आरोपी हा परममंगल पेट्रोलियम केरुर येथे अकाउंट म्हणुन कामास असताना विश्वासाने ठेवायाला दिलेले 2,31,058₹ संमतीशिवाय रोख् रक्कमेचा अपहार करुन परममंगल पेट्रोलियमची आर्थिक फस्वणुक केली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सिध्दाराम अशोक इटकळे, वय 34 वर्षे, रा. केरुर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.17.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 408, 420 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.