धाराशिव : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या तरुणीवर आणि त्यास साथ देणाऱ्या तीन तरुणावर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एक 21 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय)ही मागील 10 ते 11 महिन्या पुर्वी व दि.13.06.2024 रोजी आपल्या राहत्या घरी एकटी असल्याची संधी साधून शेजारील गावातील चार तरुणांनी संगणमत करुन त्यातील एका तरुणाने तिस लग्नाचे आमिष दाखवून तीस घेवून जावून जबरदस्तीने डांबुन ठेवून तीच्यावर लैंगीक अत्याचार केला. त्यानंतर त्या तरुणांनी तीला घडल्या प्रकाराची कोठे वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या पिडीतेने दि.18.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम-365, 366, 376, 376(2)(एन), 323, 506, 34 सह अ.जा.ज.अ.प्र. कायदा कलम 3(2)(व्ही), 3(2)(व्हीए), 3 (1)(आर), 3(1) (डब्ल्यु)(आय), 3(1) (डब्ल्यु) (ii) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
चोरीचे तीन गुन्हे
वाशी : फिर्यादी नामे-पवन सुभाष रिटे, वय 24 वर्षे, रा. सारोळा ता. वाशी जि. धाराशिव यांची अंदाजे 40,000₹ किंमतीची स्पेलंडर प्लस कंपनीची मोटरसायकल क्र एमएच 25 ए.जी. 1256 जिचा चेसी नं MBLHA10CGGHM00275 व इंजिन नं HA10ERGHM00202 ही दि. 17.06.2024 रोजी 02.13 वा. सु. वाशी येथील चव्हाण कॉम्पलेक्स समोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-पवन रिटे यांनी दि.18.06.2024 रोजी दिलेल्या पथम खबरेवरुन वाशी पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
नळदुर्ग : दि. 17.06.2024 रोजी 02.30 वा. सु. सिंमदरी तांडा येथील पवन चक्कीच्या पोल वरील 60 मिटर अंतराच्या 08 पोलवरील 7 ठिकाणच्या 02 तारा उतरवल्याचा कट करुन 1,58,000₹ किंमतीचे नुकसान करुन त्यापैकी 60 मिटर अंतराच्या 4 तारा अंदाजे 57,600₹ किंमतीच्या तारा अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्या. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-गौतमकुमार गोरेलाल सिंग, वय 35 वर्षे, व्यवसाय खाजगी नोकरी रा. समाय ता. जि. नवादा ह.मु. सिंग हाउस भीगवन रोड बारामती यांनी दि.18.06.2024 रोजी दिलेल्या पथम खबरेवरुन नळदुर्ग पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव : फिर्यादी नामे-राजेंद्र विदयाधर साळवे, वय 59 वर्षे, रा. रत्नागिरी ह.मु. शिंगोली धाराशिव ता. जि. धाराशिव यांची अंदाजे 30,000 ₹ किंमतीची होंडा सिडी डॉन कंपनीची मोटरसायकल क्र एमएच 08 क्यु 2107 जिचा चेसी नं 06 K27F03223 व इंजिन नं 06 K27E05050 ही दि. 17.06.2024 रोजी 21.00 ते दि.18.06.2024 रोजी 08.30 वा. सु. शिंगोली येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-राजेंद्र साळवे यांनी दि.18.06.2024 रोजी दिलेल्या पथम खबरेवरुन आनंदनगर पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.