• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, July 1, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

सार्वजनिक बांधकाम मंडळाचे शाखा अभियंता धनराज नाईकवाडी यांनी कमावली करोडो रुपयाची मालमत्ता

अवैधरित्या मालमत्ता खरेदी केल्याने त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी

admin by admin
June 28, 2024
in विशेष बातम्या
Reading Time: 1 min read
गुटख्याची तस्करी करणारे बीडचे मुख्य म्होरके नामानिराळे…
0
SHARES
3k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – सार्वजनिक बांधकाम मंडळाचे शाखा अभियंता धनराज नाईकवाडी यांनी अवैधरित्या मालमत्ता खरेदी केल्याने त्यांना सेवेतून बडतर्फ करुन अवैधरित्या खरेदी केलेली मालमत्ता अधिहरण करण्यात यावी, अशी मागणी सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीकडे केली आहे.

यासंदर्भात सुभेदार यांनी लेखी तक्रार दिली असून, त्यात म्हटले आहे की , जन माहिती अधिकारी तथा उप विभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विशेष प्रकल्प, (इमारती) उप विभाग, धाराशिव यांचे संदर्भ क्रमांक ३ चे पत्र पहावे ज्यान्वे धनराज विठ्ठल नाईकवाडी शाखा अभियंता यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ चे पोट नियम-१९ (२) व १९ (३) चे उल्लघन करुन त्यांनी त्यांचे स्वत:च्या व पत्नीच्या तसेच भावाच्या नावे कसबे गौडगांव ता. बार्शी जि. सोलापूर येथे गट नंबर २२१, ४३५, ११/२/२, १०/२, ५०२/१, ५२९, ४९३, ५२८, ५४८/२५ व कसबे सांजा ता. जि. धाराशिव येथे गट नंबर ९८९ तसेच कसबे चिलवडी ता. जि. धाराशिव येथे गट नंबर १४१ तसेच कसबे धाराशिव (शहर) येथे गट नंबर २०७, २०३/५, २०७, ७१७ मध्ये स्थावर मालमत्तेचे अवैधरीत्या संपादन केल्याची गंभीर बाब निदर्शनास आली असल्याने व धनराज विठ्ठल नाईकवाडी शाखा अभियंता यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ चे पोट नियम-१९ (२) व १९ (३) चे उल्लघन करुन त्यांनी त्यांचे स्वत:च्या व पत्नीच्या तसेच भावाच्या नावे स्थावर मालमत्तेचे संपादन केल्याने त्यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करुन त्यांचे विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ मधील कलम १३ (१) (ई) व १६९ नुसार गुन्हा नोंद करण्यासंदर्भात मी, संदर्भ क्रमांक १ द्वारे बाबासाहेब मारुती थोरात अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ कार्यालय, धाराशिव यांच्याकडे सर्व पुराव्यानिशी तक्रारी निवेदन दिले असता त्यांनी धनराज विठ्ठल नाईकवाडी शाखा अभियंता हे सार्वजनिक बांधकाम विभाग, धाराशिव येथील आस्थापनेवर असल्याने आपली विषयांकीत तक्रारीचा अर्ज कार्यकारी अभियंता, सार्वजिक बांधकाम विभाग, धाराशिव यांचे कडे पुढील कार्यवाहीस्तव वर्ग करण्यात येत आहे. असे त्यांचे संदर्भ क्रमांक २ च्या पत्राद्वारे मला अवगत केले असून शेषेराव चव्हाण कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, धाराशिव यांच्याकडून प्रस्तुतच्या प्रकरणात मला आजतागायत कुठलाही प्रतिसाद दिलेला नाही. ही अत्यंत गंभीर स्वरुपाची बाब आहे.

वास्तविक पाहता बाबासाहेब मारुती थोरात अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ कार्यालय, धाराशिव हे धनराज विठ्ठल नाईकवाडी शाखा अभियंता यांचे शिस्तभंग विषयक प्राधिकारी असून ते स्वत: प्रस्तुतच्या प्रकरणाची प्राथमीक चौकशी करुन किंवा त्यांचे अधिनिस्त सक्षम प्राधिकारी यांच्याकडून प्राथमीक चौकशी करुन, त्याचा अहवाल घेऊन, धनराज विठ्ठल नाईकवाडी शाखा अभियंता यांना बडतर्फ करण्यास व त्यांचे विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ मधील कलम १३ (१) (ई) व १६९ नुसार गुन्हा दाखल करण्यास सक्षम प्राधिकारी आहेत. परंतु त्यांच्याकडून आजपावेतो तशी कुठलीही कार्यवाही झालेली नाही. तसेच शेषेराव चव्हाण कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, धाराशिव हे धनराज विठ्ठल नाईकवाडी शाखा अभियंता यांचे नियंत्रण प्राधिकारी असून ते स्वत: प्रस्तुतच्या प्रकरणाची प्राथमीक चौकशी करुन किंवा त्यांचे अधिनिस्त सक्षम प्राधिकारी यांच्याकडून प्राथमीक चौकशी करुन, त्याचा अहवाल घेऊन, धनराज विठ्ठल नाईकवाडी शाखा अभियंता यांना बडतर्फ करण्याचा व त्यांचे विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ मधील कलम १३ (१) (ई) व १६९ नुसार गुन्हा दाखल करण्याचा बाबासाहेब मारुती थोरात अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ कार्यालय, धाराशिव यांच्याकडे शिफारशीसह प्रस्ताव सादर करू शकतात परंतु त्यांच्याकडून देखील आजपावेतो तशी कुठलीही कार्यवाही झालेली नाही. ही अत्यंत गंभीर स्वरुपाची बाब आहे. त्यांमुळे शासनाने संदर्भ क्रंमाक ६ च्या शासन परिपत्रकाद्वारे दिलेल्या निर्देशाकडे आपले लक्ष वेधण्यात येत आहे. तसेच संदर्भ क्रमांक २ च्या शासन परिपत्रकातील परिच्छेद क्रमांक १ पहावे, ज्यामध्ये शासनाकडे आलेल्या निवेदने/अर्जावर शासन परिपत्रक, महसूल व वन विभाग, क्र. संकीर्ण–२/ २०१०/प्र. क्र. २९/अ–२ दिनांक: १६/०२/२०१० मधील तरतुदीनुसार १२ आठवड्यात अंतीम उत्तर देण्यात यावे, अपवादात्मक परिस्थितीत त्या प्रकरणी अंतीम उत्तर देणे का शक्य नाही याचा खुलासा संबंधित अर्जदारास करण्यात यावा. तसेच जनतेच्या निवेदने/अर्जाच्या निपटाऱ्याबाबत अधिकारी/कर्मचारी हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत असेल अगर निर्णय घेण्यास टाळाटाळ करीत असेल तर अशा अधिकारी/कर्मचारी यांच्याविरुद्ध नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी. अशा सूचना निर्गमीत केल्या आहेत.

माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ च्या कलम ६ (१) अन्वये एस. जे. केत जन माहिती अधिकारी तथा सहाय्यक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ कार्यालय, धाराशिव यांच्याकडे मी, रितसर अर्ज देवून धनराज विठ्ठल नाईकवाडी शाखा अभियंता यांनी त्यांच्या स्वत:च्या व कुटुंबियाच्या नावाने स्थावर व जंगम मालमत्ता खरेदीद्वारे, विक्रीद्वारे, भेट म्हणून किंवा अन्यथा संपादित करण्यापूर्वी किंवा तिची विल्हेवाट लावण्यापूर्वी महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ चे पोट नियम-१९ (२) व १९ (३) नुसार विहित प्राधिकरणाला कळविलेल्या पत्राच्या व घेतलेल्या पुर्वमान्यता पत्राच्या प्रमाणित प्रति मिळणे संदर्भात मागणी केली असता त्यांनी सदर अर्जातील माहिती आपल्या विभागाशी संबधीत असल्याने माहिती अधिकार अधिनियम, २००५ मधील कलम ६ (३) अन्वये सदर मुळ अर्ज आपल्या कार्यालयाकडे वर्ग करण्यात येत आहे. तरी नियमाप्रमाणे अर्जदारास परस्पर माहिती उपलब्ध करुन द्यावी असे संदर्भ क्रमांक ४ च्या पत्राद्वारे उप विभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विशेष प्रकल्प, (इमारती) उप विभाग, धाराशिव यांना अवगत करुन त्याची एक प्रत मला अग्रेषित करुन उपरोक्त कार्यालयाशी संपर्क करुन माहिती प्राप्त करुन घ्यावी. व पुढील पत्रव्यवहार त्यांचेशी करण्यात यावा. अशी मला विनंती केली. परंतु उप विभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विशेष प्रकल्प, (इमारती) उप विभाग, धाराशिव यांच्याकडून उक्त परिपूर्ण माहिती न मिळाल्याने व उक्त माहिती किंवा त्याची वस्तूस्थिती ही सार्वजनिक बांधकाम मंडळ, धाराशिव यांचे कार्यालयाशी संबंधीत असल्याचे मला ज्ञात झाल्याने मी, परत माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ च्या कलम ६ (१) अन्वये एस. जे. केत जन माहिती अधिकारी तथा सहाय्यक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ कार्यालय,

धाराशिव यांच्याकडे मी, दुसऱ्यादा रितसर अर्ज देवून उक्त माहितीची मागणी केली असता त्यांनी महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्र क्र. संकीर्ण २०१२/९८९/प्र.क्र.४७९/सहा, मंत्रालय, मुंबई दिनांक १७/१०/२०१४ अन्वये आपण मागणी केलेली माहिती ही व्यापक जनहिताशी संबंध नसलेली वैयक्तीक स्वरुपाची असल्याने सदर माहिती, माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ अंतर्गत देय नाही. असे संदर्भ क्रमांक ५ च्या पत्राद्वारे मला अवगत केले आहे. जे की, नियम संगत नाही.

तेव्हा प्रस्तुतच्या प्रकरणाची पोलीस उप अधीक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, धाराशिव यांचे मार्फत उच्च स्तरीय चौकशी प्रस्तावित करुन चौकशी अंती धनराज विठ्ठल नाईकवाडी शाखा अभियंता यांना बडतर्फ करण्यासाठी वर्तमान अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ कार्यालय, धाराशिव यांना निर्देशीत करावे. व त्यांचे विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ मधील कलम १३ (१) (ई) व १६९ नुसार गुन्हा दाखल करावा. तसेच प्रस्तुतच्या प्रकरणात बाबासाहेब मारुती थोरात अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ कार्यालय, धाराशिव व शेषेराव चव्हाण कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, धाराशिव तसेच एस. जे. केत जन माहिती अधिकारी तथा सहाय्यक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ कार्यालय, धाराशिव यांनी विहीत मुदतीमध्ये शासनाच्या सुचनेनुसार कार्यवाही न करुन शासनाला नुकसान पोहचवण्याच्या उद्देशाने कायद्याची अवज्ञा करुन, कायद्याखालील निर्देशाचा हेतुपुरस्सर भंग करुन, शासनाला नुकसान पोहचवण्याकरिता चुकीचे दस्तऐवज तयार करुन, धनराज विठ्ठल नाईकवाडी शाखा अभियंता यांनी केलेल्या अपराधाची विहीत मुदतीमध्ये शासनास माहिती देण्याचे उद्देशपूर्वक टाळून, घडलेल्या अपराधाबद्दल खोटी माहिती देऊन, धनराज विठ्ठल नाईकवाडी शाखा अभियंता यांना शिक्षेपासून व मालमत्तेच्या जप्तीपासून वाचवण्याच्या उद्देशाने तसेच त्यांना शिक्षेपासून व मालमत्तेला सरकारी जप्तीपासून वाचवण्याच्या उद्देशाने चुकीच्या अभिलेखाची व लेखाची मांडणी करुन, गुन्ह्याचे स्वरूप कमी करुन, त्यांनी उक्त प्रकरणी कायद्याच्या आदेशाची अवज्ञा केली असल्याने त्यांचे विरुद्ध भारतीय दंड संहिता, १८६० चे कलम १६६, १६६(अ), १६७, १६९, २०१, २०२, २०३, २११, २१७ व २१८ नुसार गुन्हे नोंद करावे., असे या तक्रारीत म्हटले आहे.

सोबत:- १. कसबे गौडगांव ता. बार्शी जि. सोलापूर येथील गट नंबर २२१, ४३५, ११/२/२,१०/२, ५०२/१, ५२९, ४९३, ५२८, ५४८/२५ व कसबे सांजा ता. जि. धाराशिव येथील गट नंबर ९८९ तसेच कसबे चिलवडी ता. जि. धाराशिव येथील गट नंबर १४१ तसेच कसबे धाराशिव (शहर) येथील गट नंबर २०७, २०३/५, २०७, ७१७ चा नमुना नंबर ८-अ व ७/१२ तसेच फेरफार छायांकीत प्रत.जोडली आहे.

Previous Post

प्राण्यांना निर्दयपणे वागणूक देणाऱ्यावर गुन्हा दाखल

Next Post

कळंब तालुक्यातील हिंगणगावमध्ये दोन गटात तुंबळ हाणामारी, सहा जखमी

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

कळंब तालुक्यातील हिंगणगावमध्ये दोन गटात तुंबळ हाणामारी, सहा जखमी

ताज्या बातम्या

परंडा : शेळगावमध्ये पित्याचा राक्षसी अवतार: पोटच्या नऊ वर्षीय मुलीची कुऱ्हाडीने हत्या

परंडा : शेळगावमध्ये पित्याचा राक्षसी अवतार: पोटच्या नऊ वर्षीय मुलीची कुऱ्हाडीने हत्या

June 30, 2025
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव: दिवसाढवळ्या घरफोडी, सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास

June 30, 2025
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

उमरगा: जुन्या भांडणातून शेतकऱ्याला मारहाण, पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

June 30, 2025
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

शिराढोण येथे २१ वर्षीय तरुणीवर अत्याचार, धमकी देऊन वारंवार लैंगिक शोषण

June 30, 2025
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

वाशी तालुक्यातील खानापुरात दिवसाढवळ्या घरफोडी, पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास

June 29, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group