अंबी : आरोपी नामे-1) मोईन ईसाक तांबोळी, वय 20 वर्षे, रा. बारामती ता. बारामती जि. पुणे यांनी दि.26.06.2024 रोजी 09.15 वा.सु. गांडळवस्ती जवळ अंबी शिवारात महिंद्रा बोलेरो पिकअप क्र एमएच 10.एक्यु 7950 मध्ये गोवंशीय एक गाय, तीन गाय मयत, 9 जिवंत वासरे असे एकुण 43,000₹ किंमतीचे पिकअप वाहनासह एकुण 5,43,000 ₹ किंमतीचे गोवंशीय जनावरे दाटीवाटीने कोंबून निर्दयतेने जनावरांचे सुरक्षीततेची खबरदारी न घेता दोरीने आवळून बांधून वाहतुक परवाना नसताना वाहतुक करीत असताना अंबी पो. ठाणेच्या पथकास मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे नमूद व्यक्तीविरुध्द भारताचा प्राण्यास निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध कायदा कलम 11(डी)(ई)(एच), प्राणी संरक्षण अधिनियम कलम 5(अ)(1),9(बी), सह महा. पशु संरक्षण अधिनियम 1976 कलम 6 मोवाका कलम 192(अ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
मालमत्तेविरुध्द गुन्हे
भूम : फिर्यादी नामे-उत्रेश्वर कल्याण शिंदे, वय 50 वर्षे, रा. बुरुडवाडी ता. भुम जि. धाराशिव यांची अंदाजे 40,000₹ किंमतीची हिरो कंपनीची स्पेंलंडर मोटरसायक क्र एमएच 45 ए.एस. 1838 जिचा चेसी नंMBLHAW111M5K03630, इंजिन नं HA11EVM5K53474 ही दि. 20.06.2024 रोजी 10.30 ते 10.50 वा. सु. भुम शिवारातीलज विक्रम गाढवे यांचे शेताजवळील बाणगंगा नदीचे पुलावर लावेलेली अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- उत्रेश्वर शिंदे यांनी दि.26.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.