धाराशिव : दि.01.07.2024 रोजी 23.00 ते दि. 02.07.2024 रोजी 06.00 वा. सु.220 के.व्ही उपकेंद्र महापारेषण सांजा रोड धाराशिव येथीलपरंडा फिडरचे ऑग्झीलरी आयसोलेटरचे 03 कॉपर रॉड 124 कि. ग्रॅ वजनाचे रॉड, परंडा फिडरचे अर्थ ब्लेड 03 कॉपर मोठे रॉड बार्शी फिडरचे अर्थ ब्लेड 3 कॉपर मोठे रॉड 120 कि ग्रॅम वजनाचे असा एकुण 1,50,060₹ किंमतीचा मुद्देमाल अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-ओमप्रकाश भागवत गिरी, वय 39 वर्षे, उपकार्यकारी अभियंता 220 के.व्ही. अपकेंद्र महापारेषण सांजा रोड धाराशिव यांनी दि.11.07.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो ठाणे येथे भारतीय न्याय संहिता कलम 303(2) सह 136 भारतीय विधुत अधिनियम 2003 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव : फिर्यादी नामे- धनाजी दत्तात्रय आनंदे, वय 48 वर्षे, रा.अष्टविनायक अपार्टमेंट सांजा रोड धाराशिव यांचे गळ्यातील 35 ग्रॅम वजनाचे सोन्याचे लॉकेट अंदाजे 1,08,000₹ किंमतीचे हे दि. 10.07.2024 रोजी 13.00 ते 14.00 वा. सु. आयु कॉलेज धाराशिव ते खाजा शमशोद्दीन गाजी दर्गा धाराशिव येथुन गर्दीचा फायदा घेवून अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-धनाजी आनंदे यांनी दि.11.07.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो ठाणे येथे भारतीय न्याय संहिता कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
वाशी : फिर्यादी नामे-आजम रज्जाक शेख, वय 44 वर्षे, रा केशेगाव, ता. जि. धाराशिव यांनी दि. 11.07.2024 रोजी 05.30 वा. सु. एनएच 52 रोडवर वाशी तालुक्यातील गोलेगाव शिवारात ईसरुप पाटीजवळ आयशर टेम्पो क्र एमएच 14 डीएम 8836 मधील एसएच हरियाणा वायरस लि. हैद्राबाद कंपनीची 1 एमएच तांब्याताराचे 04 बॉक्स एकुण वजन 320 किलो ग्रॅम वजनाचे असा एकुण 48,000₹ किंमतीचा माल हा अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-आजम शेख यांनी दि.11.07.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो ठाणे येथे भारतीय न्याय संहिता कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.