• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, June 24, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

पंकजा मुंडेसह महायुतीचे ९ उमेदवार विजयी

काँग्रेसची एकूण 8 मतं फुटली

admin by admin
July 12, 2024
in महाराष्ट्र
Reading Time: 1 min read
पंकजा मुंडेसह महायुतीचे ९ उमेदवार विजयी
0
SHARES
1.1k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

मुंबई – विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान प्रक्रिया संपन्न झाली. सकाळी 9 वाजल्यापासून सायंकाळी 4 वाजेपर्यंत 274 आमदारांनी उत्स्फूर्तपणे मतदानात सहभाग घेतला. मतमोजणीच्या निकालानुसार, महायुतीच्या सर्व 9 उमेदवारांनी विजय प्राप्त केला आहे.

भाजपच्या 5 उमेदवारांसोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येकी 2 उमेदवारांनी यश मिळवले.

महाविकास आघाडीच्या काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रत्येकी एका उमेदवाराने विजयी ठरले. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पुरस्कृत शेकापचे उमेदवार जयंत पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला.

विजयी उमेदवारांची नावे:

  • भाजप: पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, सदाभाऊ खोत, परिणय फुके, अमित गोरखे
  • शिवसेना (शिंदे गट): भावना गवळी, कृपाल तुमाणे
  • NCP (अजित पवार): राजेश विटेकर, शिवाजीराव गर्जे
  • काँग्रेस: प्रज्ञा सातव
  • शिवसेना (ठाकरे): मिलिंद नार्वेकर
  • जाणून घ्या कोण किती मतांनी विजयी-

    उमेदवार/पक्ष किती मतांनी विजयी
    अमित गोरखे (भाजपा) 26
    पंकजा मुंडे (भाजपा) 26
    परिणय फुके (भाजपा) 26
    योगेश टिळेकर  (भाजपा) 26
    राजेश विटेकर (NCP-अजित गट) 23
    शिवाजीराव गर्जे (NCP-अजित गट) 24
    भावना गवळी (शिवसेना शिंदे) 24
    कृपाल तुमाने (शिवसेना शिंदे) 24
    प्रज्ञा सातव (काँग्रेस) 25
    मिलिंद नार्वेकर (शिवसेना-UBT) 23
    जयंत पाटील (शेकाप- NCP शरद पवार) पराभूत

    विधानपरिषद निकालाची वैशिष्ट्ये

    • काँग्रेसची एकूण 8 मतं फुटली
    • दोन वर्षानंतर पुन्हा एकदा फडणवीस यांचा राजकीय वरचष्मा
    • शरद पवारांना अजित पवारांचं एकही मत फोडता आलं नाही
    • उद्धव ठाकरेंना शिंदे यांचं एकही मत फोडता आलं नाही
    • भाजपचे तरूण चेहरे विधानपरिषदेत दिसणार
    • पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन
    • अमित गोरखेंच्या रूपानं मातंग समाजातील तरूण चेहरा विधानपरिषदेत
    • योगेश टिळेकर यांच्या माध्यमातून माळी समाजाला नेतृत्व
    • सदाभाऊ खोत यांच्या रूपात शेतकरी आणि चळवळीत कार्यकर्ता पुन्हा आमदार

    निकालाचा मॅजिक पॅटर्न
    देवेंद्र फडणवीसांनी 2022 च्या धक्कादायक निकालांचा मॅजिक पॅटर्न पुन्हा एकदा खरा करून दाखवला. 2022 ला राज्यसभा आणि विधानपरिषदेत विजयानंतर आज फडणवीसांनी विजयी हॅट्रिक केली. महत्त्वाचं म्हणजे सलग 5 टर्म आमदार असणारे शेकापचे जयंत पाटील जे शरद पवार पुरस्कृत उमेदवार होते, त्यांनाही महायुती आणि फडणवीसांनी धोबीपछाड दिली.

Previous Post

धाराशिवमध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ !

Next Post

परंडा : जमिनीच्या वादातून खून

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

परंडा : जमिनीच्या वादातून खून

ताज्या बातम्या

वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

धाराशिवमध्ये मद्यपीचा धिंगाणा, भररस्त्यात आरडाओरड करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

June 24, 2025
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

लिफ्ट देणाऱ्यानेच लुटले, महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले; वाशी पोलिसांनी आरोपीला मुद्देमालासह केले अटक

June 24, 2025
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

धाराशिवमध्ये रेल्वेखाली उडी मारून तरुणाची आत्महत्या

June 24, 2025
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

ढोकीमध्ये संतापजनक प्रकार: अल्पवयीन मुलीवर तिघांकडून लैंगिक अत्याचार, जीवे मारण्याची धमकी

June 24, 2025
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

शेतकऱ्यांची एक कोटी रुपयांची फसवणूक, नळदुर्ग पोलिसांत तिघांवर गुन्हा दाखल

June 24, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group