• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, September 17, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

कत्तलीसाठी चाललेली ४० गोवंशीय वासरे परंड्यात जप्त; ९ लाखांच्या मुद्देमालासह एकास अटक

admin by admin
April 24, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

परंडा : कत्तलीच्या उद्देशाने एका पिकअप वाहनातून अत्यंत निर्दयीपणे ४० गोवंशीय वासरांची अवैध वाहतूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार परंडा पोलिसांनी उघडकीस आणला आहे. करमाळा ते धाराशिव रोडवरील रोसा गावाजवळ गुरुवारी (दि. २३) दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत वासरांसह एकूण ९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, करमाळा-धाराशिव मार्गावरून एका पिकअप वाहनातून (क्र. एमएच १२ डी.टी. ११२२) गोवंशाची कत्तलीसाठी वाहतूक होणार असल्याची माहिती परंडा पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी रोसा गावाजवळ पाळत ठेवून सदरील वाहन अडवले. वाहनाची झडती घेतली असता, त्यामध्ये अत्यंत कमी जागेत तब्बल ४० गोवंशीय वासरे दाटीवाटीने कोंबून भरल्याचे आढळून आले.

वासरांचे तोंड आणि पाय दोरीने घट्ट बांधलेले होते. त्यांना साधी हालचालही करता येणार नाही अशा वेदनादायी आणि निर्दयी स्थितीत त्यांना कत्तलीसाठी घेऊन जाण्यात येत होते. पोलिसांनी तातडीने या मुक्या प्राण्यांची सुटका केली. या कारवाईत २ लाख रुपये किमतीची ४० वासरे आणि वाहन असा एकूण ९ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

याप्रकरणी परंडा पोलिसांनी पिकअप चालक तौफिक निसार मुलानी (वय ३५, रा. अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर) याला ताब्यात घेतले आहे. सरकारच्या वतीने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीवर परंडा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम ५(अ), ५(ब), ९(ब), ११, तसेच प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम ११(१) व प्राण्यांचे परिवहन नियम ४७, ५४, ५६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास परंडा पोलीस करत आहेत.

Previous Post

जिल्ह्यात गुटखा तस्करांवर पोलिसांची धडक कारवाई; वाशी व ढोकीत तब्बल १३ लाख ८२ हजारांचा मुद्देमाल जप्त

Next Post

जागजी शिवारात राजमा पिकाच्या गंजीला आग; २ लाखांचे नुकसान, एकावर ढोकी पोलिसांत गुन्हा दाखल

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

जागजी शिवारात राजमा पिकाच्या गंजीला आग; २ लाखांचे नुकसान, एकावर ढोकी पोलिसांत गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

दिंडेगाव : कुटुंब शेतात जाताच चोरट्यांनी घराचा पत्रा उचकटला; कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह दीड लाखांचा ऐवज लंपास

September 16, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

जळकोट : घरासमोरील कंपाऊंडच्या आडोशाला गांजाची विक्री; ७८ वर्षीय वृद्धाकडून ४२ हजारांचा गांजा जप्त, नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल

September 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : गणेश विसर्जन मिरवणुकीत कर्णकर्कश डॉल्बी अन् मर्यादेपेक्षा जास्त उंचीची आरास; पोलीस अधीक्षकांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या तिघांवर गुन्हे दाखल

September 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : जिल्हाधिकारी निवासस्थानाजवळील सावरकर चौकात लोखंडी कोयता बाळगणारा तरुण जेरबंद

September 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तलमोड चेकपोस्टवर उमरगा पोलिसांची मोठी कारवाई; स्विफ्ट डिझायरमधून होणारी अवैध गुटख्याची वाहतूक पकडली

September 16, 2026

Recent Posts

  • दिंडेगाव : कुटुंब शेतात जाताच चोरट्यांनी घराचा पत्रा उचकटला; कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह दीड लाखांचा ऐवज लंपास
  • जळकोट : घरासमोरील कंपाऊंडच्या आडोशाला गांजाची विक्री; ७८ वर्षीय वृद्धाकडून ४२ हजारांचा गांजा जप्त, नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल
  • धाराशिव : गणेश विसर्जन मिरवणुकीत कर्णकर्कश डॉल्बी अन् मर्यादेपेक्षा जास्त उंचीची आरास; पोलीस अधीक्षकांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या तिघांवर गुन्हे दाखल
  • धाराशिव : जिल्हाधिकारी निवासस्थानाजवळील सावरकर चौकात लोखंडी कोयता बाळगणारा तरुण जेरबंद
  • तलमोड चेकपोस्टवर उमरगा पोलिसांची मोठी कारवाई; स्विफ्ट डिझायरमधून होणारी अवैध गुटख्याची वाहतूक पकडली
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!