• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, April 26, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

जागजी शिवारात राजमा पिकाच्या गंजीला आग; २ लाखांचे नुकसान, एकावर ढोकी पोलिसांत गुन्हा दाखल

admin by admin
April 24, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार
0
SHARES
436
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

ढोकी: शेतात काढून ठेवलेल्या राजमा पिकाच्या गंजीला (गनिम) तसेच शेती साहित्याला आग लावून तब्बल २ लाख रुपयांचे नुकसान केल्याची धक्कादायक घटना ढोकी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जागजी शिवारात घडली आहे. याप्रकरणी गुरुवारी (दि. २३) ढोकी पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सचिन शिवाजी गायकवाड (वय ४२, मूळ रा. गुंफावाडी, सध्या रा. पारुनगर, मुरुड, जि. लातूर) असे नुकसान झालेल्या फिर्यादी शेतकऱ्याचे नाव आहे. सचिन गायकवाड यांची जागजी शिवारात शेती असून, त्यांनी शेतात राजमा पिकाची गंज लावून ठेवली होती. पावसापासून किंवा उन्हापासून बचाव करण्यासाठी त्यांनी त्यावर स्पिंकलरचे दहा पाईप आणि दोन ताडपत्रीसह इतर साहित्य ठेवले होते.

दरम्यान, बुधवार (दि. २२) रात्री १० ते गुरुवार (दि. २३) सकाळी ६ वाजेच्या सुमारास आरोपी संदीप शिवाजी गायकवाड (रा. गुंफावाडी, ता. जि. लातूर) याने त्यांच्या शेतातील राजमा पिकाच्या गंजीला आग लावली. या भीषण आगीत राजमा पीक, स्पिंकलरचे दहा पाईप, दोन ताडपत्री आणि इतर साहित्य जळून खाक झाले. यात सचिन गायकवाड यांचे तब्बल २ लाख रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

या घटनेनंतर सचिन गायकवाड यांनी ढोकी पोलीस ठाण्यात धाव घेत प्रथम खबर दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी संदीप शिवाजी गायकवाड याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३२६ (एफ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा पुढील तपास ढोकी पोलीस करत आहेत.

Previous Post

कत्तलीसाठी चाललेली ४० गोवंशीय वासरे परंड्यात जप्त; ९ लाखांच्या मुद्देमालासह एकास अटक

Next Post

जि.प. प्रशासनाची दडपशाही उधळली; अंधारात बंद केलेला ४० वर्षांचा रस्ता ठाकरे गटाने ‘शिवसेना स्टाईल’ने केला मोकळा!

Next Post
४० वर्षांचा रस्ता अचानक जि.प.चा कसा झाला? अध्यक्षांच्या मनमानीला ठाकरे गटाचा दणका, समतानगरचा रस्ता पुन्हा मोकळा!

जि.प. प्रशासनाची दडपशाही उधळली; अंधारात बंद केलेला ४० वर्षांचा रस्ता ठाकरे गटाने 'शिवसेना स्टाईल'ने केला मोकळा!

ताज्या बातम्या

 वादग्रस्त ‘स्वयंघोषित राष्ट्रसंत’ लोमटे महाराजांच्या मठात १५ वर्षीय वारकरी विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू; ५ तासांनंतरही प्रशासन बेपत्ता

 वादग्रस्त ‘स्वयंघोषित राष्ट्रसंत’ लोमटे महाराजांच्या मठात १५ वर्षीय वारकरी विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू; ५ तासांनंतरही प्रशासन बेपत्ता

April 26, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरट्यांचा सुळसुळाट; नळदुर्गमध्ये सव्वाआठ लाखांची चोरी, तर मंदिरे आणि बसस्थानकालाही केले लक्ष्य

April 26, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

परंड्यात मध्यरात्री दरोड्याचा थरार: दागिन्यांसाठी वृद्धावर चाकूने हल्ला, पत्नीचे सोन्याचे गंठण लुटले

April 26, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

झेडपी निवडणुकीतील पराभवाच्या रागातून खुनाचा प्रयत्न; वाशी पोलिसांत १२ जणांवर गुन्हा दाखल

April 26, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

खडी मशीन सील केल्याच्या रागातून एकाला अमानुष मारहाण; १७ जणांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा

April 26, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group