• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, April 24, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

जि.प. प्रशासनाची दडपशाही उधळली; अंधारात बंद केलेला ४० वर्षांचा रस्ता ठाकरे गटाने ‘शिवसेना स्टाईल’ने केला मोकळा!

admin by admin
April 24, 2026
in धाराशिव शहर
Reading Time: 1 min read
४० वर्षांचा रस्ता अचानक जि.प.चा कसा झाला? अध्यक्षांच्या मनमानीला ठाकरे गटाचा दणका, समतानगरचा रस्ता पुन्हा मोकळा!
0
SHARES
7
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : जिल्हा परिषद प्रशासनाने सर्वसामान्य नागरिकांची कोंडी करत अंधारात पुन्हा एकदा बंद केलेला समतानगरचा रस्ता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने ‘शिवसेना स्टाईल’ने मोकळा केला आहे. पंचायत समिती गेट ते समतानगर जाणारा हा १२ मीटर रुंदीचा रस्ता पहाटेच्या वेळी काटेरी कुंपण आणि सिमेंट पोल रोवून बंद करण्यात आला होता. मात्र, शिवसैनिकांनी हे कुंपण उखडून फेकत सर्वसामान्यांसाठी हा रस्ता पूर्ववत खुला करून प्रशासनाला सणसणीत चपराक लगावली आहे.

काय आहे नेमका घटनाक्रम?

धाराशिव नगर परिषद हद्दीतील, जिल्हाधिकारी कार्यालय ते समता कॉलनीला जोडणारा हा रस्ता गेल्या ४० – ५० वर्षांपासून नागरिकांच्या वहिवाटीचा आहे. हजारो नागरिक, ज्येष्ठ नागरिक यांना रुग्णालये, बँका आणि शासकीय कार्यालयात जाण्यासाठी हा सर्वात जवळचा आणि सोयीचा रस्ता आहे. असे असताना, २५ मार्च रोजी अचानक जि.प. प्रशासनाने हा रस्ता बंद करण्याची आगळीक केली.

या मनमानीविरोधात २७ मार्च रोजी ठाकरे गटाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना थेट निवेदन देऊन रस्ता खुला करण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर प्रशासनाने नमते घेत हा रस्ता तात्काळ खुला केला होता. मात्र, प्रशासनाने आपला आडमुठेपणा सोडला नाही. २२ एप्रिल रोजी रात्रीच्या अंधारात पुन्हा एकदा या रस्त्यावर काटेरी कुंपण घालून तो बंद करण्यात आला. यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत होती, ज्याचा उद्रेक आज कुंपण तोडण्यात झाला.

१ कोटी ३० हजारांचा निधी मंजूर, मग रस्ता बंद का?

या संपूर्ण प्रकरणात संशयाची सुई प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर जाते. कारण, याच रस्त्याच्या कामासाठी प्रशासनाकडून तब्बल १ कोटी ३० हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. निधी मंजूर असतानाही रस्ता तयार करण्याऐवजी तो वारंवार बंद करण्याचा हेतू काय? हा रस्ता बंद करण्यासाठी जि.प. प्रशासनावर नेमका कोणाचा दबाव आहे? सर्वसामान्यांची अडवणूक करून कोणाचे हित साधले जात आहे? असे संतप्त सवाल आता विचारले जात आहेत.

तर पुन्हा ‘शिवसेना स्टाईल’ने उत्तर देऊ – ठाकरे गट

“ज्या-ज्या वेळी जिल्हा परिषद प्रशासन दडपशाही करून हा रस्ता बंद करण्याचा प्रयत्न करेल, त्या-त्या वेळी नागरिकांच्या हक्कासाठी ‘शिवसेना स्टाईल’नेच रस्ता खुला केला जाईल,” असा सज्जड इशारा ठाकरे गटाकडून देण्यात आला आहे.

या धडक कारवाईवेळी युवासेना जिल्हाप्रमुख रवी वाघमारे, शहरप्रमुख सोमनाथ गुरव, नगरसेवक नाना घाडगे, पंकज पाटील, अमित उंबरे, उपशहरप्रमुख बंडू आदरकर, मनोज उंबरे, सागर मोरे यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Previous Post

जागजी शिवारात राजमा पिकाच्या गंजीला आग; २ लाखांचे नुकसान, एकावर ढोकी पोलिसांत गुन्हा दाखल

Next Post

भीमजयघोषाने दणाणली धाराशिव नगरी; अठरापगड जाती-धर्मांचा मिरवणुकीत सहभाग

Next Post
भीमजयघोषाने दणाणली धाराशिव नगरी; अठरापगड जाती-धर्मांचा मिरवणुकीत सहभाग

भीमजयघोषाने दणाणली धाराशिव नगरी; अठरापगड जाती-धर्मांचा मिरवणुकीत सहभाग

ताज्या बातम्या

भीमजयघोषाने दणाणली धाराशिव नगरी; अठरापगड जाती-धर्मांचा मिरवणुकीत सहभाग

भीमजयघोषाने दणाणली धाराशिव नगरी; अठरापगड जाती-धर्मांचा मिरवणुकीत सहभाग

April 24, 2026
४० वर्षांचा रस्ता अचानक जि.प.चा कसा झाला? अध्यक्षांच्या मनमानीला ठाकरे गटाचा दणका, समतानगरचा रस्ता पुन्हा मोकळा!

जि.प. प्रशासनाची दडपशाही उधळली; अंधारात बंद केलेला ४० वर्षांचा रस्ता ठाकरे गटाने ‘शिवसेना स्टाईल’ने केला मोकळा!

April 24, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

जागजी शिवारात राजमा पिकाच्या गंजीला आग; २ लाखांचे नुकसान, एकावर ढोकी पोलिसांत गुन्हा दाखल

April 24, 2026
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

कत्तलीसाठी चाललेली ४० गोवंशीय वासरे परंड्यात जप्त; ९ लाखांच्या मुद्देमालासह एकास अटक

April 24, 2026
धाराशिवमध्ये सव्वा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

जिल्ह्यात गुटखा तस्करांवर पोलिसांची धडक कारवाई; वाशी व ढोकीत तब्बल १३ लाख ८२ हजारांचा मुद्देमाल जप्त

April 24, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group