धाराशिव: 17 जुलै रोजी सायंकाळी 8:15 वाजता, धाराशिव शहरातील डीआयसी रोड जवळील हॉस्पिटलमध्ये एका व्यक्तीवर निर्घृण हल्ला करण्यात आला. आरोपी, श्रीकांत चव्हाण, रवीकांत चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी, शरद पडवळ यांना मारण्याच्या उद्देशाने शिवीगाळ आणि मारहाण केली. पडवळ गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी नामे- श्रीकांत महादेव चव्हाण, रवीकांत महादेव चव्हाण, राजुबाई महादेव चव्हाण, विवेक चव्हाण, आकाश चव्हाण, लखन चव्हाण सर्व रा. बोंबले हनुमान, भगतसिंह तांडा धाराशिव ता. जि. धाराशिव यांनी दि. 17.07.2024 रोजी 20.15 वा. सु. डीआयसी रोड जावळे हॉस्पीटल धाराशिव येथे फिर्यादी नामे-शरद प्रमोद पडवळ, वय 32 वर्षे, रा. उपळा ह.मु. विकास नगर धाराशिव ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी मागील भांडणाचे कारणावरुन गैरकायद्याची मंडळी जमवून जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, कोयता व काठीने मारहाण करुन गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- शरद पडवळ यांनी दि.20.07.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो ठाणे येथे भारतीय न्याय संहिता कलम 109, 115 (2), 189, 191(2), 190,352, 351(2) (3) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
मुरुम: 19 जुलै रोजी रात्री 10 वाजता, मुरुम तालुक्यातील आलुर येथे एका व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबावर हल्ला करण्यात आला. आरोपी, इरेश हावळे, सुभाष हावळे आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी, दिनकर कांबळे आणि त्यांच्या पत्नी आणि मुलावर लाथाबुक्क्या, सळई आणि काठीने हल्ला केला. कांबळे कुटुंब जखमी झाले आहे. या प्रकरणी मुरुम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी नामे-इरेश प्रकाश हावळे, सुभाष बाबुराव हावळे, भारत लक्ष्मण हावळे, बस्वराज लक्ष्मण हावळे, नागेश प्रकाश हावळे, विजय शरणु कांबळे, गायत्री युवराज कांबळे, आश्विनी श्रीशैल्य कांबळे, सर्व रा. आलुर ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि. 19.07.2024 रोजी 22.00 वा. सु.भिमनगर आलुर येथे फिर्यादी नामे- दिनकर नागनाथ कांबळे, वय 42 वर्षे, रा. आलुर ता. उमरगा जि. धाराशिव यांना व त्यांची पत्नी व मुलास नमुद आरोपींनी काहीएक कारण नसताना गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, सळईने, काठी व बेल्टने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- दिनकर कांबळे यांनी दि.20.07.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पो ठाणे येथे भारतीय न्याय संहिता कलम 189(2), 191(2)(3), 190, 118(2), 115 (2), 352, 351(2) (3) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.