धाराशिव- तुगाव येथे रविवारी सकाळी दहाच्या सुमारास पाच जणांच्या टोळक्याने एका व्यक्ती व त्याच्या दोन मुलांवर हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली.
नागनाथ भगवान शेंडगे (५८, रा. तुगाव) यांना आरोपींनी धक्का लागल्याच्या कारणावरून शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी, काठीने व दगडाने मारहाण केली. नागनाथ यांचे पुत्र गोविंद व वैभव हे भांडण सोडवण्यासाठी धावून आले असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. आरोपींनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी अर्जुन गुरुनाथ शेंडगे, गुरुनाथ भागवान शेडगे, कृष्णा गुरुनाथ शेंडगे, वदंना गुरुनाथ शेंडगे, अश्विनी गुरुनाथ शेंडगे (सर्व रा. तुगाव) यांच्याविरुद्ध ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.