नळदुर्ग – कार्ला गावात राहणाऱ्या सागरबाई अंकुश बंडगर (वय 35 वर्षे) यांनी 16 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी श्रीहरी बळी कांबळे यांच्या शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.तु सावत्र आहेस तुझे येथे काहीच नाही अशा शब्दांत शिवीगाळ करुन मारहाण केल्याने तिने हे टोकाचे पाऊल उचलले.
सागरबाई यांना त्यांच्या सासरच्या लोकांकडून शारीरिक व मानसिक त्रास दिला जात होता. दिर सखाराम शिवाजी धानुरे, नंणद भाग्यश्री शिवाजी धानुरे, आणि सासू कमलाबाई शिवाजी धानुरे (सर्व रा. कार्ला, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) यांनी तु सावत्र आहेस, तुझे येथे काहीच नाही अशा शब्दांत शिवीगाळ करुन मारहाण केली होती. या त्रासाला कंटाळून सागरबाई यांनी आत्महत्या केली असल्याची तक्रार रामकृष्ण उमराव येडगे (वय 29 वर्षे, रा. कार्ला, ता. तुळजापूर) यांनी 20 ऑगस्ट 2024 रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात नोंदवली आहे.
या तक्रारीवरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात संबंधित आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 108, 115(2), 352, 351(2), आणि 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस तपास सुरू आहे.