• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, September 5, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

गुटखा प्रकरणी नळदुर्गच्या पाच पोलिसांची उचलबांगडी

येरमाळ्याच्या वसूलदारवर केव्हा कारवाई होणार ?

admin by admin
October 12, 2023
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
धाराशिव लाइव्हचा दणका : गुटखा प्रकरणी पाच पोलिसांची मुख्यालयात उचलबांगडी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – गुटखा प्रकरणी नळदुर्ग पोलीस स्टेशनमधील पोलीस उपनिरीक्षक अंधारे यांच्यासह पाच पोलीसांची धाराशिव मुख्यालयात उचलबांगडी करण्यात आली असली तरी येरमाळा पोलीस स्टेशनमधील एका वसूलदार पोलिसाची अद्याप पोलीस मुख्यालयात बदली न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

नळदुर्ग पोलिसांनी गुटखा प्रकरणी कश्या प्रकारे तोडपाणी केली , याची मालिकाच धाराशिव लाइव्हने प्रसिद्ध केली होती. याप्रकरणी उपविभागीय अधिकारी नीलेश देशमुख यांनी सर्व पोलिसांना नोटिसा देऊन त्यांचे म्हणणे घेतले आणि नंतर चौकशी अहवाल पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना पाठवला होता, त्यानंतर पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांनी नळदुर्ग पोलीस स्टेशनमधील पोलीस उपनिरीक्षक अंधारे यांच्यासह पाच पोलीसांची धाराशिव मुख्यालयात बदलीची ऑर्डर काढली पण येरमाळा पोलीस स्टेशनमधील एका वसूलदार पोलीसाची अद्याप पोलीस मुख्यालयात बदली न झाल्याचे उलट सुलट चर्चा सुरु आहे.

तुळजापूर उड्डाण पुलाजवळ के.बी. ने एक गुटख्याची गाडी अडवून तोडपाणी केली होती, त्याची बातमी देखील धाराशिव लाइव्हने दिल्यानंतर या के.बी. ला देखील नोटीस बजावण्यात आली होती. त्याने गोलमाल उत्तर त्यावेळी दिले होते.

तेरखेडा बिट पाहणारा हा वसूलदार पोलीस पूर्वी महामार्ग पोलीस म्हणून कार्यरत होता. त्याचे आणि गुटखा किंग नकुल पंडित ( साळवी ) याचे थेट संबंध आहेत, गुटखा तस्करीतून मिळालेल्या पैश्यातून त्याने पुण्यात चार फ्लॅट, चार चाकी वाहने, वाशीजवळ प्लँटिंगची जमीन घेतली आहे. या के.बी. ची अद्याप उचलबांगडी का केली नाही ? याबाबत पोलीस मुख्यालयात दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.

काय आहे प्रकरण ?

निगडी ( पुणे ) येथील निखिल ट्रान्सपोर्टचा आयशर टेम्पो ( क्रमांक एमएच २५, एजे १४८६ ) हा हैद्राबाद येथून गुटखा भरून नळदुर्ग पोलीस स्टेशनच्या हद्दीत येताच, दि. १९ जुलै रोजी रात्री गोलाई चौक, चिवरी पाटीजवळ काही तरुणानी जबरदस्तीने आडवून तो सपोनि सिद्धेश्वर गोरे यांच्या ताब्यात दिला होता.

गुटख्याचा आयशर टेम्पो ( क्रमांक एमएच २५, एजे १४८६ ) पकडल्यानंतर गुटखा तस्कर नकुल पंडित ( मूळ आडनाव साळवी ) हा चांगलाच चिडला आणि हप्ता देऊन देखील गाड्या पकडत असाल तर काय उपयोग म्हणून सुनावल्यानंतर गोरेनी त्या टेम्पोमधील गुटखा चालकांमार्फत अज्ञात ठिकाणी उतरवून, रिकामा टेम्पो दाखवून दि. २१ जुलै रोजी गुटख्याच्या गाड्या पकडणाऱ्या गणेश नागनाथ वचने ( वय १९ ) , सय्यद अमीर अझहर जहागीरदार ( वय २२), संदीप संजय राठोड , सुशील संजय राठोड, मिटू उर्फ इंद्रजितसिंह ठाकूर सर्व रा. नळदुर्ग यांच्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल केला. टेम्पो चालक सहदेव माडजे रा. कोंडजी ता. लोहारा यास मारहाण करून १२ लाखाचा आयशर टेम्पो आणि खिशातील ३५ हजार जबरदस्तीने पळवून नेल्याचा गुन्हा या झिरो पोलिसांवर दाखल करण्यात आला होता.

पोलिसांच्या सांगण्यावरूनच आपण गुटख्याचा सदर टेम्पो ताब्यात घेतला पण पोलिसांनी वाटा देण्याऐवजी दरोड्याचा गुन्हा दाखल केल्याने हे झिरो पोलीस चांगलेच चिडले. यातील सय्यद अमीर अझहर जहागीरदार याच्या चुलत्याने सर्व पुरावे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना दिल्याने गोरेंची अवघ्या चार दिवसात पोलीस मुख्यालयात उचलबांगडी झाली.

याप्रकरणी धाराशिव लाइव्हने गुटखा प्रकरणी मालिका प्रसिद्ध केली होती. अखेर याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अंधारे यांच्यासह पाच पोलीसांची धाराशिव मुख्यालयात उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यात पोलीस हेड कॉन्स्टेबल विशाल सागर, नेताजी दगडू गेजगे, विश्वनाथ शिंदे, नितीन राठोड, बलदेवसिंग ठाकूर आदींचा समावेश आहे.

 

Previous Post

उमरगा आणि लोहारा येथे हाणामारी

Next Post

उर्जा विभागाने तुघलकी निर्णय घेऊ नये – आ. कैलास पाटील

Next Post
उर्जा विभागाने तुघलकी निर्णय घेऊ नये – आ. कैलास पाटील

उर्जा विभागाने तुघलकी निर्णय घेऊ नये - आ. कैलास पाटील

ताज्या बातम्या

नळदुर्ग किल्ल्यावर तीन मुलांसह महिलेची उडी; आई, मुलगा आणि एका मुलीचा मृत्यू

संपादकीय | अश्विनी पौळ प्रकरण : कुस्तीच्या आखाड्यात जिंकणारी महिला संसाराच्या आखाड्यात का हरली?

September 5, 2026
नळदुर्ग किल्ल्यावर तीन मुलांसह महिलेची उडी; आई, मुलगा आणि एका मुलीचा मृत्यू

नळदुर्ग : अश्विनी पौळ प्रकरणी पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

September 5, 2026
विद्यानंद बापट प्रकरण : डीजेच्या आवाजापासून कॅमेऱ्यासमोर झालेल्या हल्ल्यापर्यंत नेमकं काय घडलं?

विद्यानंद बापट प्रकरण : डीजेच्या आवाजापासून कॅमेऱ्यासमोर झालेल्या हल्ल्यापर्यंत नेमकं काय घडलं?

September 4, 2026
धाराशिव जिल्ह्यात शिक्षक भरतीत ३०० बोगस नियुक्त्या!

‘व्हिजन २०३०’ ला काळी फीत! शिक्षक दिनीच गुरुजींचा एल्गार, ‘प्रमोशन घोटाळा’ आणि शाळा एकत्रीकरणाविरुद्ध साखळी उपोषण!

September 4, 2026
नळदुर्ग किल्ल्यावर तीन मुलांसह महिलेची उडी; आई, मुलगा आणि एका मुलीचा मृत्यू

नळदुर्ग किल्ल्यावर तीन मुलांसह महिलेची उडी; आई, मुलगा आणि एका मुलीचा मृत्यू

September 4, 2026

Recent Posts

  • संपादकीय | अश्विनी पौळ प्रकरण : कुस्तीच्या आखाड्यात जिंकणारी महिला संसाराच्या आखाड्यात का हरली?
  • नळदुर्ग : अश्विनी पौळ प्रकरणी पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
  • विद्यानंद बापट प्रकरण : डीजेच्या आवाजापासून कॅमेऱ्यासमोर झालेल्या हल्ल्यापर्यंत नेमकं काय घडलं?
  • ‘व्हिजन २०३०’ ला काळी फीत! शिक्षक दिनीच गुरुजींचा एल्गार, ‘प्रमोशन घोटाळा’ आणि शाळा एकत्रीकरणाविरुद्ध साखळी उपोषण!
  • नळदुर्ग किल्ल्यावर तीन मुलांसह महिलेची उडी; आई, मुलगा आणि एका मुलीचा मृत्यू
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!