उमरगा : आरेापी नामे- 1) रवि प्रभाकर पवार, 2) राजकुमार प्रभाकर पवार, 3)प्रभाकर नरसिंग पवार, सवर् रा. तुरोरी,ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि. 10.10.2023 रोजी 08.30 वा. सु. तुरारेरी येथे फिर्यादी नामे- कृष्णा कमलाकर पवार, वय 27 वर्षे, रा. तुरोरी, ता. उमरगा जि. धाराशिव यांना मागील भांडणाचे कारणावरुन नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. तसेच फिर्यादी यांच्या आईस शिवीगाळ करुन तुझे मुलाला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली. अशा मजकुराच्या कृष्णा पवार यांनी दि.10 .10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 336, 324, 323, 504, 506, अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
लोहारा : आरेापी नामे- 1)भास्कर गुंडाप्पा कुंभार, रा. कास्ती बु. ता. लोहारा जि. धाराशिव यांनी दि.10.10.2023 रोजी 12.00 वा. सु. कास्ती बु शिवार शेत गट नं 279 मध्ये फिर्यादी नामे- श्रीकांत विठोबा कोळी, वय 55 वर्षे रा. कास्ती बु लोहारा जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने सामाईक बांधावरील गवत फिर्यादी यांचे शेतात टाकण्यावरुन नमुद आरोपीने फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी काठीने मारहाण केली. अशा मजकुराच्या श्रीकांत कोळी यांनी दि.10.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन लोहारा पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 323, 504, अन्वये गुन्हा नोंदवला आहे.