वाशी येथे भाड्याच्या वादातून एका वृद्धासह तिघांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. महादेव मनोहर चेडे, नवनाथ मनोहर चेडे, देवानंद बाबासाहेब चेडे यांच्यासह आठ जणांनी मच्छिंद्र किसनराव चेडे (वय 70) यांना लाथाबुक्क्यांनी, लोखंडी रॉड, काठी, कुऱ्हाडीने मारहाण केली. यात मच्छिंद्र चेडे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या खिशातील 20,000 रुपयेही लुटण्यात आले. मच्छिंद्र यांचा मुलगा सूर्यकांत व मुलगी यांनाही मारहाण करण्यात आली. या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी नामे-महादेव मनोहर चेडे, नवनाथ मनोहर चेडे, देवानंद बाबासाहेब चेडे, निखील नवनाथ चेडे, पांडुरंग भगवान चेडे, चैतन्य पांडुरंग चेडे, सुमन नवनाथ चेडे, देवानंद चेडे यांच पत्नी सर्व रा. सारोळा(वाशी) ता. वाशी जि. धाराशिव यांनी दि. 30.08.2024 रोजी 19.00 वा. सु. सारोळा (वाशी) येथे फिर्यादी नामे- मच्छिंद्र किसनराव चेडे, वय 70 वर्षे, रा. सारोळा(वाशी) ता. वाशी जि. धाराशिव यांना नमुद आरोपी मागील भाडंणाचे कारणावरुन गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी,लोखंडी रॉड,काठी, कुह्राडीने मारहाण करुन गंभीर जखमी करुन खिशातील 20,000₹ काढून घेतले. तसेच फिर्यादीचा मुलगा सुर्यकांत मच्छिद्रं चेडे यांना लोखंडी रॉडने मारहाण करुन जखमी केले. फिर्यादीची मुलगी ही भांडण सोडवण्यास आली असता तिसही नमुद आरोपींनी शिवीगाळ करन मारहाण केली. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-मच्छिंद्र चेडे यांनी दि.01.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 118(2),333, 119(1),118(1), 115(2), 189(2), 191( 2), 191(3),190, 351(3), 352 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.