धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या घटना वाढत चालल्या असून, उमरगा, तुळजापूर, आणि धाराशिव शहरात तीन वेगवेगळ्या ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये अन्नधान्य, चांदीचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू चोरीला गेल्या आहेत.
उमरगा: येळी गावातील उमराव मारुती बनसोडे (वय 65 वर्षे) यांचे शेतातील पत्र्याचे शेड अज्ञात चोरट्यांनी दि. 14 सप्टेंबरच्या रात्री 9.00 ते 15 सप्टेंबरच्या सकाळी 6.00 या वेळेत तोडले. चोरट्यांनी करडी, भुईमुगाच्या शेंगा, हरभरा, ज्वारी व इतर वस्तू असा एकूण 19,500 रुपयांचा माल चोरून नेला. यासंदर्भात उमरगा पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. 331(4), 334(1) अंतर्गत गुन्हा नोंदवला गेला आहे.
तुळजापूर: तुळजापूरच्या पूजा अलंकार दुकानात 9 सप्टेंबर रोजी चार अनोळखी महिलांनी चांदीचे चैन व अंगठी दाखवण्याचा बहाणा करुन दुकानदार शुभांगी किरण वाडेकर व त्यांची सहकारी संस्कृती कवडे यांना बोलण्यात गुंतवले. त्यांची नजर चुकवून, महिलांनी 29 चांदीचे चैनचे जोड, 1,890 ग्रॅम वजनाचा, एकूण 70,000 रुपयांचा माल चोरून नेला. तुळजापूर पोलीस ठाण्यात या घटनेचा गुन्हा भा.न्या.सं. 303(2), 3(5) अंतर्गत नोंदवला गेला आहे.
धाराशिव : धाराशिव शहरातील शाश्वत ज्वेलर्सच्या दुकानात 31 ऑगस्ट रोजी, चांदीचे दागिने दाखवण्याच्या बहाण्याने चोरट्यांनी रविंद्र वामनराव मोरे यांचे लक्ष विचलित करून 10 पैंजन पाकीट चोरले. धाराशिव शहर पोलीस ठाण्यात या घटनेवर गुन्हा भा.न्या.सं. 303(2), 3(5) अंतर्गत नोंदवला गेला आहे.