• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, February 20, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिवच्या कलेक्टर साहेबांची तुळजापुरातील ‘धडक’ स्टोरी !

admin by admin
October 5, 2024
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
धाराशिवच्या कलेक्टर साहेबांची तुळजापुरातील ‘धडक’ स्टोरी !
0
SHARES
4.7k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर – नवरात्र उत्सवाच्या जल्लोषात महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचं नाव घेतलं जातंय, पण या जयघोषात आमचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे साहेब मात्र ‘सीमोल्लंघन’ खेळतायत! कसं काय, विचाराल? तर गुरुवारी घटस्थापना झाली, आणि तिथेच साहेबांचा नशीबही उध्वस्त झालं.

आता हे असं काय झालंय? धाराशिवचे सत्यशोधक कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी घटस्थापनेच्या पवित्र दिवशी साहेबांच्या ‘नॉन क्रीमी लेअर’ प्रमाणपत्राचं बोगस प्रकरण बाहेर काढलं! अहो, हे प्रकरण महाराष्ट्रभर चर्चा आहे! साहेबांच्या चेहऱ्यावरच्या हास्याचं सीमोल्लंघन झालं आणि मूड चांगलाच गडबडलाय.

पण हेच काय? ह्यापुढे ऐका. तुळजाभवानी मंदिरापासून निघालेले साहेबांचे वाहन जरा पुढे आलं असता, येडशीचा एक देवीभक्त मोटारसायकलवरून समोर आला आणि साहेबांच्या गाडीला धडक दिली! अहो, होय, डॉ. ओंबासे साहेब यांची सरकारी चारचाकी गाडी आणि येडशीवाल्याची दुचाकी गाडी समोरासमोर धडकली. साहेबांच्या गाडीचं किरकोळ नुकसान झालं, पण ह्यापेक्षा मजेदार भाग पुढे आला.

साहेबांच्या गाडीत असलेल्या पोलिसानं येडशीच्या देवीभक्ताला चटकन धरलं, ट्रॅफिक पोलिसांच्या स्वाधीन केलं, आणि तिथेच 1000 रुपये दंड ठोठावला! एवढंच नाही, तर गाडीही जप्त केली. सध्या गाडी पोलिस ठाण्यात शांत झोपतेय, पण गुन्हा का दाखल नाही, म्हणून चर्चेची बरीच धुमाळी चालू आहे. वरिष्ठ साहेब दंड करणाऱ्या पोलिसाला गुन्हा दाखल का केला नाही म्हणून उठा- बशा करायला लावत आहेत.

आता प्रश्न असा आहे, चूक मोटारसायकलवाल्याची की साहेबांच्या ड्रायव्हरची? पण, मोठ्या माणसांचा प्रश्न असला की छोटी माणसं फटकवली जातात, हे मात्र नक्की!

Previous Post

तुळजापूर विधानसभेच्या रिंगणात साड्यांचे राजकारण आणि हवा भरण्याची स्पर्धा !

Next Post

“तुळजापूर नवरात्र: भक्तीचा उत्सव की चोरांचा महोत्सव?”

Next Post
तुळजापूर तालुक्यातील माजी आमदाराच्या ‘अनुदान फंडा’ची अफलातून खेळी!

"तुळजापूर नवरात्र: भक्तीचा उत्सव की चोरांचा महोत्सव?"

ताज्या बातम्या

वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

लहान मुलांच्या भांडणातून तरुणावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; तुळजापुरात एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल

February 20, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

शेतातील बंधाऱ्याच्या वादातून तरुणावर कोयता आणि लोखंडी साखळीने जीवघेणा हल्ला

February 20, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

पवनचक्कीचे पोल वाकवल्याच्या संशयावरून एकाला लोखंडी गजाने बेदम मारहाण; वाशी पोलिसांत दोघांवर गुन्हा दाखल

February 20, 2026
शिवजयंतीनिमित्त ‘राजा शिवाजी’चा दमदार फर्स्ट लूक प्रदर्शित

शिवजयंतीनिमित्त ‘राजा शिवाजी’चा दमदार फर्स्ट लूक प्रदर्शित

February 19, 2026
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

धाराशिव: कत्तलीसाठी गोवंशाची वाहतूक करणारी गाडी जप्त; वाशी पोलिसांत गुन्हा दाखल

February 19, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group