• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, September 7, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तुळजापूरच्या देवीचा आशीर्वाद आणि चोरांची ‘पावती’ – देवीच्या नगरीत चमत्कारिक चोरी!

admin by admin
October 21, 2024
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
तुळजापूरच्या देवीचा आशीर्वाद आणि चोरांची ‘पावती’ – देवीच्या नगरीत चमत्कारिक चोरी!

रतनबाई बोराडे

0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर – महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीचं दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक रोज देवीच्या चरणी येतात. काही भक्त देवीच्या प्रसादाने तृप्त होतात, तर काही चोर ‘चमत्काराने’ तृप्त होतात! तुळजापूर शहरातील एक अनोखी चोरी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

करीना आनंद पवार या महिलेने देवीच्या मंदिराबाहेर पोत, रुद्राक्ष माळा आणि शंख विकून आपलं पोट भरण्याचा छोटा व्यवसाय सुरू केला होता. रोजच्या गजबजलेल्या रस्त्यावर आपल्या लहान बाळाला कुशीत घेत ही महिला श्रद्धाळू भाविकांना माळा विकत असे. सायंकाळी सगळा माल एका पिशवीत भरून ती दुकानात ठेवत असे. सगळं सुरळीत चाललं होतं, पण एका दिवशी देवीने चमत्कार केला… चोरांचा!

शहरात थोडी वेगळी ‘भाविक’ महिला, रतनबाई बोराडे, हिचं थोडंसं वेगळं दर्शन घडतं. ती चोरलेल्या पैशातून दारू घेऊन चक्क रस्त्यावर फिरत असते, देवाच्या नावाने चोरी करत सुखी असते. एका दिवसात तिने करीना पवारची रुद्राक्ष माळा, शंख, महादेवाच्या पिंडी असलेली पिशवी उचलली आणि थेट लातूर गाठलं. चोरलेल्या पिशवीतील माल विकून १०,३०० रुपयांचे चांदीचे जोडवे, मणी एका सोनारांकडून खरेदी केले, दुसऱ्या दिवशी पुन्हा तुळजापुरात आली आणि नवा सावज शोधू लागली.

इकडे, करिना पवारचं मात्र नशीब फारच वाईट होतं. ती रडत-रडत पोलिस स्टेशन गाठली, पण पोलिसांनी तिचं दु:ख कमी करण्याऐवजी तिला थोडी ‘वेटिंग लिस्ट’ दिली. शेवटी तक्रार तर नोंदवली, पण चोर कोण? पोलिसांनाही माहित नव्हतं.

देवीने मात्र चमत्कार केला आणि करिनाला चोर रतनबाई बोराडे दिसली  थेट तुळजापूरच्या बाजारात !  रतनबाईच्या हातात तिची चोरी गेलेली पिशवी होती , मात्र  सर्व माल गायब ! तथापि  पिशवीत चोरी गेलेल्या घराच्या दिसल्या आणि खात्री पटल्याने करिनाने ताबडतोब तिला पकडलं आणि पोलिस स्टेशनला आणलं. पण पोलिसांनी तिची नशा उतरायची वाट पाहत तिला अटक केली नाही. शेवटी अटक झाली, चोर रतनबाई बोराडे हिने चोरीची कबुली दिली शिवाय चोरीच्या पैश्यातून लातुरातील बागडे ज्वलर्स येथून चांदीचे जोडवे, मनी, मंगळसूत्र घेतल्याचे सांगितले. पण चोरीच्या मालाचा हिशोब अजून बाकीच आहे!

तुळजापूरच्या या गजबजलेल्या नगरीत, देवीचं दर्शन घेताना लक्ष असू द्या… कदाचित कुणी भाविक असेल, की ‘चोर-भाविक’ असेल, हे सांगता येणार नाही!

फिर्यादी महिला तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये न्यायाच्या प्रतीक्षेत ( व्हिडीओ पाहा )

Previous Post

धाराशिव शहरातील खड्ड्यांमुळे नागरिकाचे जीवन धोक्यात, राष्ट्रवादीकडून ८ दिवसांची मुदत

Next Post

धाराशिवमध्ये हातलादेवीचा आशीर्वाद कोणाला मिळणार ?

Next Post
धाराशिवमध्ये हातलादेवीचा आशीर्वाद कोणाला मिळणार ?

धाराशिवमध्ये हातलादेवीचा आशीर्वाद कोणाला मिळणार ?

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तुळजापूर : मंगरूळ रोडवर नैसर्गिक विधीसाठी थांबलेल्या प्रवाशाला अडवून १० हजारांची रोकड लांबवली

September 6, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

काटगाव : अवैध हातभट्टी दारू अड्ड्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला; धक्काबुक्की करत कामात अडथळा

September 6, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तुळजापूर : खोटे सोन्याचे बिस्कीट देऊन भाविकांची फसवणूक करणारा भामटा बीडमधून जेरबंद

September 6, 2026
अश्विनी पौळ यांच्या तिसऱ्या मुलीचाही मृत्यू; नळदुर्ग किल्ला प्रकरणाने धाराशिव हादरले

अश्विनी पौळ यांच्या तिसऱ्या मुलीचाही मृत्यू; नळदुर्ग किल्ला प्रकरणाने धाराशिव हादरले

September 6, 2026
धाराशिव भाजपमधला ‘पाटील विरुद्ध पाटील’ सामना: पत्रिकेतून साहेबांचा ‘पत्ता कट’ अन् ठाकरेंच्या आमदाराला मानाचे पान!

धाराशिव भाजपमधला ‘पाटील विरुद्ध पाटील’ सामना: पत्रिकेतून साहेबांचा ‘पत्ता कट’ अन् ठाकरेंच्या आमदाराला मानाचे पान!

September 5, 2026

Recent Posts

  • तुळजापूर : मंगरूळ रोडवर नैसर्गिक विधीसाठी थांबलेल्या प्रवाशाला अडवून १० हजारांची रोकड लांबवली
  • काटगाव : अवैध हातभट्टी दारू अड्ड्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला; धक्काबुक्की करत कामात अडथळा
  • तुळजापूर : खोटे सोन्याचे बिस्कीट देऊन भाविकांची फसवणूक करणारा भामटा बीडमधून जेरबंद
  • अश्विनी पौळ यांच्या तिसऱ्या मुलीचाही मृत्यू; नळदुर्ग किल्ला प्रकरणाने धाराशिव हादरले
  • धाराशिव भाजपमधला ‘पाटील विरुद्ध पाटील’ सामना: पत्रिकेतून साहेबांचा ‘पत्ता कट’ अन् ठाकरेंच्या आमदाराला मानाचे पान!
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!