लोहारा – लोहारा येथे मागील भांडणाच्या कारणावरून दोन जणांनी एका तरुणाला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी व लाकडाने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. ही घटना २३ ऑक्टोबर रोजी दुपारी २.३० वाजता चेतन बार समोर घडली.
याप्रकरणी महेश विजयकुमार शेवाळे (वय ३०, रा. लोहारा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रविकांत भाउराव रोडगे आणि मिथुन (दोघेही रा. लोहारा) यांच्याविरुद्ध लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी महेश शेवाळे यांना मागील भांडणाच्या कारणावरून शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी व लाकडाने मारहाण केली. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. या मारहाणीत शेवाळे गंभीर जखमी झाले आहेत.
पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंवि कलम ११८(२), ११५(२), ३५२, ३५१(२)(३), ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.