• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, August 26, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

जनतेला पिण्याचे पाणी व जनावरांना चारा याला प्राधान्य द्या

- खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर

admin by admin
October 17, 2023
in मुख्य बातमी
Reading Time: 1 min read
जनतेला पिण्याचे पाणी व जनावरांना चारा याला प्राधान्य द्या
0
SHARES
169
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – जनतेला पिण्याचे पाणी व जनावरांना चारा याला प्राधान्य द्या , अशी मागणी खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री .तानाजी सावंत साहेब अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी त्यांनी ही मागणी लावून धरली.

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून धाराशिव नगरपालिकेस दिलेला विकास निधी हा गेली 3 वर्षा पासून अखर्चीक आहे. तो खर्च करून प्रस्ताविक विकास कामे मार्गी लावावीत. जिल्ह्यात चालू वर्षी पाऊस 60 टक्के झालेला असून त्यामुळे भविष्यात पाणी व चारा टंचाई चे भयावह संकट येऊ शकते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आताच उपाययोजना हाती घेवून त्या अनुषंगाने नियोजन करावे.

राष्ट्रीय पेय जल योजनेतून प्राधान्याने विहिरीची कामे हाती घ्यावीत. रोजगार हमी योजनेतून लातूर प्रमाणे कामे आपल्या जिल्हयातही सुरु करावी. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीस मंजूर असलेल्या निधीतून रोहीत्र (ट्रान्सफार्मर) बसवण्याची कामे तात्काळ पुर्ण करावीत. धाराशिव शहराला होणारा पाणीपुरवठा हा सद्या आठवड्यातून एकदा होत असल्याचे बैठकीत सांगण्यात आले शहराचा पाणी पुरवठा आठवड्यातून दोन वेळेस नियमीतपणे करावा, अशी मागणीही खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केली आहे.

या बैठकीस जिल्हयाचे आमदारकैलास घाडगे -पाटील, विधानपरिषद आमदार विक्रम काळे , जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्त पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी आदी उपस्थित होते.

यंत्रणांनी निर्धारित वेळेत निधी खर्च करून जिल्ह्याच्या विकासाला गती द्यावी- पालकमंत्री सावंत

जिल्ह्याच्या विकासासाठी तसेच विविध योजनांच्या लाभार्थ्यांसाठी यंत्रणांना जिल्हा नियोजन समितीकडून निधी उपलब्ध करून देण्यात येतो.यंत्रणांना देण्यात येणारा निधी यंत्रणांनी निर्धारित वेळेपूर्वीच खर्च करून जिल्ह्याच्या विकासाला गती द्यावी.असे निर्देश पालकमंत्री तानाजी सावंत यांनी दिले.

जिल्ह्यातील कोणतेही गाव स्मशानभूमीपासून वंचित राहणार नाही. जिल्ह्यातील 622 गावात स्मशानभूमीसाठी नोव्हेंबरपर्यंत प्रशासनाने जमीन उपलब्ध करून द्यावी. स्मशानभूमीसाठी जिल्ह्यात जागा उपलब्ध करून देण्याचे काम प्रशासनाने वेगाने सुरू केले आहे. स्मशानभूमीसाठी लागणारी शासकीय जमीन 78 ग्रामपंचायतींना हस्तांतरित करण्यात आली आहे. महावितरणला विविध कामांसाठी देण्यात आलेला निधी वेळेत खर्च करून कामे पूर्ण करावी. महावितरणला निधीची आवश्यकता असल्यास मागणी करावी. निधीची तरतूद करण्यात येईल असे सावंत म्हणाले.

 

Previous Post

बाहेर निषेध आणि आत पालकमंत्र्याचे बूट चाटले

Next Post

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या स्मारक उभारणीचा मार्ग मोकळा

Next Post
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या स्मारक उभारणीचा मार्ग मोकळा

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या स्मारक उभारणीचा मार्ग मोकळा

ताज्या बातम्या

धाराशिव शहराच्या दुरवस्थेवरून काँग्रेस आक्रमक; नगर परिषदेवर हल्लाबोल

धाराशिव शहराच्या दुरवस्थेवरून काँग्रेस आक्रमक; नगर परिषदेवर हल्लाबोल

August 26, 2025
धाराशिवमध्ये मोठी फसवणूक: ‘सुखमनी कंपनी’वर कोट्यवधींच्या घोटाळ्याचा आरोप, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

बनावट शपथपत्र तयार करून प्लॉट हडपण्याचा प्रयत्न; तुळजापुरात दोघा भावांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

August 26, 2025
धाराशिव : म्हशीचे वासरू शेतात घुसल्याच्या वादातून दोन गटांत तुंबळ मारामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल

कळंब तालुक्यातील वडगाव येथे किरकोळ कारणावरून गटबाजी; चौघांना मारहाण, आठ जणांवर गुन्हा दाखल

August 26, 2025
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरांचा सुळसुळाट; घरे, शेत आणि कंपन्या लक्ष्य, एकाच दिवसात १४ लाखांवर डल्ला

August 26, 2025
धाराशिव : म्हशीचे वासरू शेतात घुसल्याच्या वादातून दोन गटांत तुंबळ मारामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल

येडशी टोलनाक्याजवळ २० हजारांचा गुटखा जप्त, एकावर गुन्हा दाखल

August 26, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group