नळदुर्ग : फिर्यादी नामे- धानय्या राजशेकर स्वामी, वय 40 वर्षे, रा. महादेव गल्ली, उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.17.10.2023 रोजी जळकोट ते सोलापूर जाणारे रोडवर जळकोट जवळून उमरगा येथुन तुळजापूर कडे पायी जात असताना दोन अज्ञात इसमांनी धानय्या स्वामी यांना रस्त्यात आडवून मारहाण करुन खिशातील रेडमी कंपनीचा मोबाईल अंदाजे 5,000₹व रोख रक्कम 700 ₹ जबरीने लुटून पसार झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी- धानय्या स्वामी यांनी दि.18.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. 394, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर : फिर्यादी नामे- लक्ष्मण गणपतराव चौगुले, वय 56 वर्षे, रा. हडको वसाहत तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांची अंदाजे 50,000₹ किंमतीची होंडा सीबी युनिकॉर्न क्र एमएच 25 एई 7050 ही दि.15.10.2023 रोजी 00.30 ते 03.00 वा. सु. लक्ष्मण चौगुले यांचे राहाते घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी- लक्ष्मण चौगुले यांनी दि.18.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव : फिर्यादी नामे- धनाजी रामा चव्हाण, वय 43 वर्षे, रा. सेवालाल कॉलनी तेरणा कॉलेजचे पाठीमागे धाराशिव ता. जि. धाराशिव यांची अंदाजे 55,000₹ किंमतीची बजाज पल्सर मोटरसायकल क्र एमएच 25 एझेड 5961 ही दि.11.10.2023 रोजी 13.30 वा. सु. तेरणा कॉलेजच्या बाजूस सेवालाल कॉलनी रोडचे कॉर्नर जवळ धाराशिव येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी- धनाजी चव्हाण यांनी दि.18.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.